जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२५ । अंकलेश्वर ते बहऱ्हाणपूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी दिल्लीतील सडक परिवहन राजमार्ग मंत्रालयाने राजपत्र प्रसिद्ध केले. त्यात रावेर तालुक्यातील सुमारे १५ नवीन गावांचा समावेश केला आहे. या नवीन गावांमधील जमिनी संपादित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार फैजपूर प्रांतांना प्राधिकृत करण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत.

बऱ्हाणपूर ते तळोदा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५चे बीई तळोदा १४३ किमी ते बहऱ्हाणपूर ३८३ किमी या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी विविध गावात भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या महामार्गात बदल झालेल्या गावांचा समावेश करून महामार्गात जाणाऱ्या जमिनींचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिसूचना काढली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून रावेर तालुक्यातील चर्चेचा ठरलेला विषय मार्गी लागला.
तळोदा ते ब-हाणपूर महामार्ग मुक्ताईनगर मतदार संघात येणाऱ्या रावेर तालुक्यातील गावांमधून व मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावांतून जाणार असल्याचे २४ जानेवारी २०२२ आणि ७ नोव्हेंबर २०२३च्या अधिसूचनेनुसार निश्चित केले होते. यात कोचूर, विवरा, नांदुरखेडा, अंतुर्ली मार्गे जाणाऱ्या महामार्गात बदल केला होता. पण या मार्गे महामार्ग करण्याबाबत स्थानिकांचा विरोध होता. त्यात रावेर शहरातून किंवा रावेर जोडून हा महामार्ग जात नसल्याने रावेर परिसरातही नाराजी होती. यासंदर्भात आंदोलने देखील झाली होती. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत हा महामार्ग रावेर तालुक्यातील भातखेडे, रावेर, कोंद, पातोंडी, पुनखेडे, तामसवाडी, खिरवड, वाघोड, मोरगाव खुर्द, मोरगाव बुद्रुक, अटवाडे, अजनाड, खानापूर, चोरवड या गावांमधून जाईल.
तीन राज्य, ८ हजार कोटींचा खर्च
हा चौपदरी महामार्ग गुजरातमधून ७ किमी, महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून ५८, धुळे ४८, तर जळगाव जिल्ह्यातून १२० किमी आणि मध्य प्रदेशातून १३ किमी जाईल. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर तालुक्यातून हा महामार्ग जाईल. महामार्गासाठी भूसंपादनाचे ३ हजार कोटी व रस्ता बांधणीवर ५ हजार कोटी असा एकूण ८ हजार कोर्टीचा खर्च होईल.
या गावांच्या शिवारांचा समावेश
रावेर तालुक्यातील भातखेडे, रावेर, कर्जाद, पातोंडी, पुनखेडे, तामसवाडी, खिरवड, वाघोड, मोरगाव खुर्द, मोरगाव बुद्रुक, अटवाडे, अजनाड, खानापूर, चोरवड या गावांमधील जमिनी अधिग्रहित करण्यासाठी फैजपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केले असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार पुढील हालचालींना वेग येईल.
Hello sir
हॅलो सर चोपडा तालुक्यातील धानोरा गावातील कोणते गट नंबर आहे सांगा कृपया
तालुका रावेर मधील कोचर बुद्रुक गावातील गट नंबर कोणते ते कृपया कळावे?