भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू ; रावेर तालुक्यातील घटना

एप्रिल 28, 2025 3:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२५ । रावेर तालुक्यातील बोर घाटात भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात थार जीप आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पिंटू बोडोले (वय ३०) असं मयत पित्याचे नाव असून रितीक बोडोले (वय ३) असं मुलाचे नाव आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी संबंधित थार गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

borghat ac

या घटनेबाबत असं की, पिंटू बोडोले हे कुटुंबासह भुसावळ येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. रविवारी ते पत्नी मालुबाई (वय २८) आणि दोन मुले यांच्यासह दुचाकीने भुसावळहून पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान, रात्रीच्या सुमारास रावेर तालुक्यातील बोर घाटात खेरगावकडून भुसावळच्या दिशेने येणाऱ्या एका थार गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पिंटू आणि त्यांचा लहान मुलगा रितीक याचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या आदिवासी कुटुंबावर अचानक मोठे संकट कोसळले आहे.

या अपघातात जखमी मालुबाई बोडोले आणि लहान मुलगा टेंगुराम यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी फैजपूर येथे हलवले. या घटनेबाबत पोलिसांनी संबंधित थार गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment