चाळीसगावात घरफोडी; साडेअकरा लाखांचे दागिने लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । चाळीसगाव शहाररात घराचे कुलूप तोडून कपाटातील तब्बल साडेअकरा लाख रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीसगाव शहरातील शास्त्री नगरमधील योगेश कॉलनी परिसरात दत्तात्रय भिला मालपुरे हे शिक्षक राहतात. दि. 11 व 12 नोव्हेंबर 2022 या कालावधीत त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुम मधील कपाटात ठेवलेले 11 लाख 69 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

यात ‎ ५० ग्रॅमची एक लाख २५ हजारांची‎ सोन्याची मंगल पोत, दोन लाख ७५‎ हजारांची ५५ ग्रॅम सोन्याची पोत, एक‎ लाखाची २० ग्रॅम सोन्याची चेन, एक‎ लाखाच्या २० ग्रॅम सोन्याच्या‎ बांगड्या, दीड लाखांच्या ३० ग्रॅमच्या‎ ४ सोन्याच्या अंगठ्या, १० हजारांच्या‎ दोन ग्रॅम सोन्याच्या बाळ्या, सव्वा‎ लाखांच्या सोन्याच्या २५ अंगठ्या,‎ ८० हजारांचे १६ ग्रॅमचे दोन झुमके,‎ सव्वा लाखांचा २५ ग्रॅमचा सोन्याचा‎ हार, १२ हजारांचे तीन ग्रॅमचे पेंडल,‎ १२ हजारांची तीन ग्रॅमची सोन्याची‎ नथ, २५ हजारांचा पाच ग्रॅम‎ सोन्याचा तुकडा, ३० हजारांची सहा‎ ग्रॅमची सोन्याची चेन. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. आव्हाड हे करीत आहेत.