जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळील भिलाटी गावातील घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील बापू पवार (वय २३, रा. मंगरूळ ता. अमळनेर) यांनी पोलिसांत तक्रार दिली. पवार हे सदर ठिकाणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १८ जुलै रोजी रात्रीचे जेवण करून झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोट्याने त्यांच्या घरातून ३० हजार रुपयांची रोकड, ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ९ हजाराचा मोबाईल असा एकूण ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याचे उघड केला आले.
याबाबत सुनील पवार यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे.