⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

घरफोडीतील आरोपी जेरबंद; एलसीबीच्या पथकाची कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज। २२ एप्रिल २०२२। येथील सिंधी कॉलनीत बंद घर फोडून चोरटयांनी पाच लाखांचा ऐवज लांबविलायची घटना घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, सिंधी कॉलनीतील साधना आश्रमजवळील कंवरनगरातील रोहीत इंद्रकुमार मंधवानी हे कुटुंबियांसह त्यांच्या आत्याच्या मुलाच्या लग्नासाठी अमरावती येथे गेले होते. दरम्यान २६ रोजी ते लग्नकार्य आटोपून घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले होते. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयित हे तांबापूरा भागात राहत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे पथक रवाना केले. संशयित आरोपी हनीफ काकर (वय-२०) आणि त्याचा साथीदार अन्सार शहा रूबाब (वय-१९) रा. तांबापूरा यांनी तांबापूरात अटक करण्यात आली. दोघांनी घरफोडीची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी दोघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शोखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली.