हरताळातुन सव्वा लाखांच्या म्हशी लांबवल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गावाला लागून असलेल्या एका शेतातून शेतकर्‍याच्या एक लाख 15 हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी चोरट्याने लांबवल्याची घटना उघडीस आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

धनराज श्रीराम शेळके (51, हरताळा, ता.मुक्ताईनगर) यांचे सालबर्डी गावाजवळ रस्त्यावर शेत गट नंबर 683 असून या शेतात त्यांनी म्हशी बांधलल्या होत्या. सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एक लाख 15 हजार रुपये किंमतीच्या दोन म्हशी मध्यरात्री छोटा हत्ती वाहनातून चोरून नेल्या. हा प्रकार त्यांना पहाटे चार वाजेच्या सुमारास लक्षात आल्यानंतर त्यांनी म्हशींचा सर्वत्र शोध घेतला परंतु त्यांना कुठेही म्हशी न आढळल्याने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विजय पढार करीत आहे.