किनगावच्या बौद्ध भिक्खूची हिंगोलीत लॉजवर आत्महत्या

ऑक्टोबर 18, 2021 1:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय बौद्ध भिक्खूने हिंगोली येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. अनिल उर्फ जितू गोविंद तायडे असे मृताचे मूळ नाव असून गुनानंद धम्मरत्न अशी त्यांची ओळख होती.

Untitled design 97 jpg webp

यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवासी अनिल उर्फ जितू गोविंद तायडे (वय-४८), या बौद्ध भिक्खूनी रविवारी हिंगोलीतील गांधी चौकात असलेल्या साई लॉजमध्ये दुपारी १२ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. गुनानंद धम्मरत्न अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिस तपास करत आहे. गुनानंद धम्मरत्न यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर किनगावात सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now