⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | एरंडोल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

एरंडोल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १६ मे २०२२ । श्रावस्ती पार्क एरंडोल येथे सकाळी सात वाजता बुद्ध जयंती निमित्त श्रावस्ती पार्क जयंती उत्सव समिती मार्फत अभिवादन सभेचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस मोठ्या प्रमाणावर एरंडोल मधील नागरीक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एरंडोल शहरातील ज्येष्ठ आंबेडकरी नेते शालिग्राम दादा गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भाऊ बिऱ्हाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार व हिरालाल महाजन यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रा. भरत शिरसाठ यांनी त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा व प्रास्ताविक सादर करून कार्यक्रमास सुरुवात केली. शालिग्राम दादा गायकवाड ईश्वर भाऊ बिऱ्हाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार व प्रकाश तामस्वरे आण्णा यांनी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक नरेंद्र तायडे यांनी आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी रघुनाथ सपकाळे, मीरा सपकाळे, विमलबाई रामोशी, कमलबाई बाविस्कर, प्रवीण केदार, प्रकाश शिंदे, भगवान ब्रम्हे, मीना ब्रम्हे, चिंतामण जाधव, मनीषा जाधव, मुकेश ब्राम्हणे, रमा ब्राम्हणे, निंबा खैरनार, अलका खैरनार, सुभाष अमृतसागर, जयश्री अमृतसागर, वर्षा शिरसाठ व मोठ्या प्रमाणावर शहरातील नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी भरत शिरसाठ लिखित ‘सत्यशोधक आणि इतर कथा’ व वर्षा शिरसाठ लिखित ‘त्यागमूर्ती माता रमाई’ या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह