Sunday, December 4, 2022

500 रूपयाची लाच भोवली ; लाचखोर कोषागार अव्वल कारकूनला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । अवघी पाचशे रूपयांची लाच घेणी यावल तहसील कार्यालयाच्या कोषागार विभागातील अव्वल कारकूनाला भोवली आहे. मुक्तार तडवी (यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव असून लाचखोरास जळगाव एसीबीच्या पथकाने यावल तहसील कार्यालयातून अटक केली. या कारवाईमुळे यावल तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तहसील कार्यालयातील कोषागार विभागातील अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी याने काम करण्याच्या मोबदल्यात ५०० रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या करवाईमुळे खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांनी तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी याने कोणत्या कारणासाठी पैसे घेतले याची चौकशी सुरू आहे.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक (रीडर) सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुले, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, प्रवीण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, पोलिस कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टैबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

- Advertisement -
[adinserter block="2"]