पात्रता फक्त 4थी पास अन् वेतन 52000 पर्यंत ; मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नवीन भरती..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर चौथी पास असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत स्वयंपाकी पदासाठी भरती होणार आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज पाठवावा. Bombay High Court Bharti 2023

भरलेला अर्ज कुठे पाठवाल?
पात्र उमेदवारांनी आपला अर्ज प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद 431009 येथे पाठवावा.

भरले जाणाऱ्या पदाचे नाव : कूक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान चौथी पास असावा

काय आहे वयाची अट : उमेदवार हा 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षाची असेल. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही
तुम्हाला किती पगार मिळेल?
वेतनश्रेणी सातव्या आयोगानुसार निवड झालेल्या उमेदवाराला 16,600 ते 52,400 रुपये पगार मिळेल, व इतर देय भत्तेही मिळतील.

वेबसाईट : bombayhighcourt.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Application Form: येथे क्लिक करा