⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | गुन्हे | बेपत्ता बालिकेचा मृतदेह कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली आढळला ; भडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना..

बेपत्ता बालिकेचा मृतदेह कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली आढळला ; भडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२३ । भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. भडगाव पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असलेल्या नऊ वर्षीय बालिकेचा मृतदेह कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला आहे. कल्याणी संजय पाटील (रा.गोंडगाव, ता. भडगाव) असं मृत बालिकेचं नाव असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कल्याणी पाटील ही बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार ३० जुलै रोजी भडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांकडून बालिकेचा शोध घेण्याचे काम सुरु होते. या बालिकेचा तपास सुरू असतानाच काल मंगळवारी गावातील एका गोठ्यातील कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात ही बालिका मृत अवस्थेत आढळून आली. या दुर्दैवी घटनेने गावासह परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख यांच्यासह भडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली असून या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहे.

दरम्यान, बालिकेचा मृतदेह शव शवविच्छेदनासाठी जळगाव मेडिकल कॉलेजला रवाना करण्यात आला. दरम्यान, गावातील काही ग्रामस्थाना मका कुट्टीच्या खळ्या जवळ मुलीची चप्पल दिसली. तिच्या चपलेची ओळख पटल्याने मका कुट्टी जवळ शोध सुरू झाला. येथून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना मुलीचा दबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.