⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

शिकारी कुत्र्यांनी घेतला नील गायीचा जीव

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । येथून जवळच असलेल्या क.ब.चौ.उ.म. विद्यापीठात  कुत्र्यांच्या हल्ल्यात नर नीलगायीचा मृत्यू झाला आहे.

क.ब.चौ.उ.म. विद्यापीठातील शिक्षक भवनच्या रस्त्यावर निलगायीवर १५ ते २० कुञे हल्ला करीत असल्याचे शिक्षक भवनचे कर्मचारी अशोक पाटील यांच्या निर्देशनास आले. त्यांनी लागलीच पळत जाऊन त्यांना उसकावण्याचा प्रयत्न केला असता कुञे त्यांच्या अंगावर देखील धाऊन आले, तेव्हा त्यांनी सुरक्षारक्षक अमोल पाटील यांच्या मदतीने कुञ्यांना हुसकावून लावले. कुञांनी मोठ्या प्रमाणात जखमी केल्यामुळे निलगायीचा तडफडून मृत्यू झाला. 

सुरक्षा रक्षक अमोल पाटील यांनी तिला पाणी पाजले परंतु गायीचा मृत्यू झाला. त्यानंतर अशोक पाटील यांनी सदरची घटना वन्यप्रेमी अरूण सपकाळे व सुरक्षा अधिकारी शेखर बोरसे यांना सांगितले असता त्यांनी वन विभागाला कळवले. त्यानंतर वन विभागाचे वनपाल राजकुमार ठाकुर व त्यांचे 3 सहकारी यांनी वन विभागाच्या वाहनात सदर निलगायीला टाकून पुढील कार्यवाहीसाठी नेले. कुत्र्यांनी सर्वत्र हैदोस मांडला असून नेहमी कुणाला तरी चावा घेतलेला असतो.