हनुमान जयंतीनिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । संपुर्ण देशात व आपल्या महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातले असुन यामुळे रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या दोघ ठिकाणी ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले आज दिनांक २७  एप्रिल २०२१ रोजी हनुंमान जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आज भा.ज.पा जळगाव जिल्हा महानगर तर्फे घेण्यात आले आज सकाळी ९.०० ते ११.०० दरम्यान मंडल क्र. ४ व ९  येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले सकाळी ९.०० वाजता मंडल क्र ४ नंदनवन कॉलनी येथे सृष्टी हॉस्पिटल  येथे आ  सुरेश (राजूमामा )भोळे महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी  जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी डॉ राधेश्याम चौधरी  यांच्या हस्ते श्री हनुमान प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली शिबिराचे नियोजन मंडल अध्यक्ष  केदार देशपांडे, निलेश कुलकर्णी यांनी केले  नगरसेविका सौ.दीपमाला  काळे, धिरज वर्मा, ललित लोकचदाणी , यांनी रक्तदान करून सुरुवात केली.

या प्रसंगी प्रदेश महिला आघाडी  उपाध्यक्षा उज्वलाताई बेडाळे  विशाल पाटील, उपाध्यक्ष पिंटू भाऊ काळे मा नगरसेवक  मनोज भंडारकर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, चेतन तिवारी, मंडळ सरचिटणीस, महिला आआघाडी अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, रेखाताई वर्मा, रिक्षा आघाडी अध्यक्ष  प्रतीक शेठ, जयंत चव्हाण, सागर पोळ इ.उपस्थित होते.  तसेच मंडल क्र ९  महाबळ स्टॉप, जाणता राजा चॉक येथे रक्तदान शिबीर सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान घेण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी  नितीन इंगळे, राहुल वाघ, ,युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, सचिन बाविस्कर, जयंत चव्हाण, गौरव पाटील, अबोली पाटील, प्रसाद पाटील, आकाश पाटील, अमित सोळंकी,  सुरसिंग पाटील, रवींद्र कोळी(नाना भाऊ), संजय तिरमले, अनंत देसाई, प्रवीण मोहोर, पंकज सावळे, चेतन अदंगले, संतोष डांबरे, भुपेश कुलकर्णी, प्रथम पाटील, अशोक महाजन, रोहित सोनवणे, रुपेश मौर्य,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

राजु मामा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, श्री हनुमान हे सेवेचे प्रतीक असून भाजपा हे सेवेला प्राधान्य देणारा पक्ष असुन जन सेवा हिच राष्ट्र सेवा  हा पक्षाचा खरा  उदेश आहे असे या प्रसंगी सांगितले.