जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

मार्च 7, 2026 3:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील गुरुकुल कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांच्या वतीने परमपूज्य श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

blod donet

हे शिबिर रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार असून यासाठी परिसरातील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबिर इंडियन रेडक्रॉस जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरासाठी प्रमुख उपस्थित डॉक्टर म्हणून डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी व त्यांच्या तज्ञ डॉक्टरांची टीम तसेच डॉ. नरेंद्र सोनार उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय डॉ. विनोद शहा, ललित भारंबे आणि ममता शहा तसेच गुरुकुल कॉलनी केंद्रातील सर्व सेवेकरी शिबिराच्या आयोजनात सहकार्य करणार आहेत.या उपक्रमात केंद्र प्रतिनिधी सुनंदा चौधरी तसेच पंच कमिटी सदस्य सुभाष चौधरी, दिलीप इंगळे, जितेंद्र फालक, भारती पाटील आणि सेजल चौधरी आदी सेवेकरी सक्रिय सहभाग घेणार आहेत.हे रक्तदान शिबिर गुरुकुल कॉलनी, क्राऊन बेकरीच्या मागे, सेंट जोसेफ स्कूलजवळ, एम. जे. कॉलेज रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.संपर्क : ९४२३१४८७२१, ९८९०४८४१३६

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now