⁠ 
शनिवार, मे 18, 2024

लाच भोवली ! ग्रामसेवकासह शिपाई जळगाव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२४ । मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत शिपायाला ६ हजाराची लाच घेताना जळगाव येथील लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. मनोज सूर्यकांत घोडके असे ग्रामसेवकाचे नाव असून सचिन अशोक भोलाणकर असे शिपाईचे नाव आहे. या कारवाईने खळबळ उडाली.

राजुरा येथील तक्रारदाराने आईच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ग्रामपंचायत दप्तरी मुलाचे नाव फेरफार करण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र ती फेरफार करण्यासाठी ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके याने तक्रारदारास ११ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती.

राजुरा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके आणि शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी तक्रारदाराकडून ठरलेल्या ११ हजारांपैकी सहा हजारांची लाच स्वीकारली.त्याच वेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्यावर झडप घालून लाच स्वीकारलेली सहा हजारांची रक्कम हस्तगत करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पर्यवेक्षक अधिकारी म्हणून लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पो. नि. अमोल वालझाडे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो. ना. बाळू मराठे, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पो. ना. किशोर महाजन, पो. कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी, पो. कॉ. सचिन चाटे यांच्या पथकाने कारवाई केली

मोठी बातमी! मान्सून केरळमध्ये ‘या’ तारखेला दाखल होणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

0

जळगाव लाईव्ह न्युज : १५ मे २०२४ : यंदाचा मान्सून पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र मान्सून भारतात कधी दाखल होईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यातच भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये कधी दाखल याची तारीख जाहीर केली आहे. नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
यंदा 19 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याचा अंदाज आयएमडीकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पुढील 10 दिवसांत मान्सून केरळमध्ये येणार आहे. म्हणजेच यंदा 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहचणार आहे. मान्सून केरळमध्ये आल्यावर त्याची महाराष्ट्राकडे वाटचाल सुरु होते. केरळमधून पुढील 4 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.

मागील वर्षी 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. सर्वसामान्यपणे मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मागील वर्षी एल निनोचा प्रभाव मान्सूनवर होता. तो यंदा कमकुवत झाला आहे. भारतीय उपसागरात आता ला निनो सक्रीय झाला आहे. यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे.

मागील ५ वर्षांची आकडेवारी
मागील ५ वर्षांची आकडेवारी बघितली तर, २०१९ मध्ये ८ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. २०२० मध्ये १ जूनला मान्सून केरळात,. २०२१ मध्ये ३ जून रोजी मान्सूनचे केरळात आगमन झाले. २०२२ – २९ मे, २०२३ – ८ जून आणि २०२४ मध्ये ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे.

आजचा दिवस लाभदायक आणि आनंददायी असेल ; वाचा गुरुवारचे राशिभविष्य

0
horoscope

मेष
आर्थिक बाबतीत दिवस खर्चिक जाईल. कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे. आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकाकडून पैसे मिळू शकतात. लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा जप करा.

वृषभ
कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. आज तुम्ही धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. नोकरदारांनी थोडे सावध राहावे. आरोग्य चांगले राहील. आज तुम्हाला काही पुरस्कार किंवा बोनस मिळू शकतो. पिवळे कपडे घालून घराबाहेर पडा.

मिथुन
कमाई चांगली होईल, प्रभावही वाढेल. आज एखाद्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल. प्रवासात सावध राहा. मानसिक तणाव असू शकतो. कपाळावर पिवळे तिलक लावावे.

कर्क
आजचा दिवस लाभदायक आणि आनंददायी असेल. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे. आरोग्य चांगले राहील. भगवान विष्णूची पूजा करा.

सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आज यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. विष्णु चालीसा पाठ करा आरोग्य चांगले राहील.

कन्या
आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. आज आंब्याचे दान करा.

तूळ
आज तुम्हाला मोठे यश मिळेल, कुटुंबात मतभेद वाढू शकतात. आज तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. आर्थिक लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर देशी तुपाचा दिवा लावावा.

वृश्चिक
आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल, नोकरदारांनी सावध राहावे. आज तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. आरोग्य चांगले राहील.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुमचा प्रवास यशस्वी होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे. आरोग्य चांगले राहील. एखाद्या गरीबाला पीठ दान करा.

मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कठीण जाईल. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. आरोग्याची काळजी घ्या. घरात गंगाजल शिंपडावे.

कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे. आरोग्य चांगले राहील. पांढरे चीज दान करा.

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. कौटुंबिक जीवनात काही मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

निवडणुकीनंतर तुमच्या फोनचा रिचार्ज महागणार ; पहा किती रुपयांनी होणार वाढ?

0
Broadband Plan
फोटो प्रतीकात्मक

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२४ । सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरु असून मात्र निवडणुकीनंतर सर्वसामान्यांचा फोनचा रिचार्ज महागणार आहे. टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅन वाढवण्याच्या तयारीत असून तब्बल २५ टक्क्यांनी बिल वाढण्याची शक्यता आहे.

माहितीनुसार, शहरी आणि ग्रामीण भागात ही वाढ दिसून येते. अहवालानुसार, पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही योजना पूर्वीपेक्षा महाग होऊ शकतात. दुसरीकडे, इंटरनेट योजना देखील महाग असू शकतात.

ARPU (Average revenue per user) वर वापरकर्त्यांची संख्या वाढेल म्हणजेच कंपन्यांच्या सरासरी महसूलात वाढ होणार आहे. अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्या लवकरच टॅरिफमध्ये लक्षणीय वाढ करू शकतात. या कंपन्यांनी ५ जी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि आता त्यांना त्यांचा नफा वाढवण्याची गरज असल्यामुळे टेलिकॉमवरील ग्राहकांचा खर्च शहरी घरांसाठी एकूण खर्चाच्या ३.२% वरून ३.६% पर्यंत वाढेल तर ग्रामीण ग्राहकांसाठी तो ५.२% वरून ५.९% पर्यंत वाढेल.

ॲक्सिस कॅपिटलने अंदाज लावला आहे की, सुमारे २५ टक्क्यांची दरवाढ केल्याने टेलिकॉम कंपन्यांसाठी एआरपीयू मध्ये १६ टक्के वाढ होणार असून भारती एअरटेलसाठी ते २९ रुपये आणि जिओसाठी २६ रुपये असेल. तसेच देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओने मार्च तिमाहीसाठी १८१.७ रुपये एआरपीयू नोंदवला आहे. भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया (Vi) साठी ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी अनुक्रमे २०८ रुपये आणि १४५ रुपये होते तर अजूनही भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने मार्च तिमाहीचे आकडे जाहीर केलेले नाहीत.

आता जर 25 टक्के दरवाढ झाली, तर सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होईल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.तुम्ही दर महिन्याला 200 रुपयांचे रिचार्ज केल्यास ते 50 रुपयांनी वाढेल. याचा अर्थ 200 रुपयांचा टॅरिफ प्लॅन 250 रुपयांना मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही 500 रुपयांचे रिचार्ज केले तर ते 25 टक्क्यांनी 125 रुपयांनी वाढेल. जर तुम्ही 1000 रुपयांचा रिचार्ज केला तर त्याचे मूल्य 250 रुपयांनी वाढेल आणि एकूण टॅरिफ किंमत 1250 रुपये होईल.

जळगाव जिल्ह्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढणार ; 19 मेपर्यंत असे राहणार तापमान?

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आज बुधवारी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाचा अंदाज असला तरी उन्हाचा चटका मात्र कायम आहे. असह्य करणारा उकाडा जाणवत असून यामुळे जळगावकर हैराण झालाय. यातच उद्या गुरुवारपासून जिल्ह्यात काही दिवस उन्हाचा पारा पुन्हा वाढण्याचाही अंदाज आहे.

यंदा एप्रिल महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त होते. त्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा ४२ अंशांच्या पुढेच राहिला होता. मात्र, १० मेनंतर वातावरणात बदल होऊन, दुपारपर्यंत कडक ऊन व त्यानंतर, मात्र ढगाळ वातावरण अशी स्थिती काही दिवसांपासून निर्माण होत आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सकाळी कडाक्याचे ऊन व दुपारी ३ वाजेनंतर वातावरणात बदल होऊन, जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसासोबतच गारपिटीचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र उद्यापासून उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे.

१६ मेनंतर वातावरणात बदल होऊन, जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. १६ ते २३ मे दरम्यान जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. २५ मे नंतर मात्र जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते. यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी पंधरवड्यात कडाक्याचे ऊन व पाऊस अशी स्थिती जळगावकरांना अनुभवायला मिळणार आहे

आगामी पाच दिवस असे राहणार तापमान
१५ मे रोजी तापमान ४० अंशपर्यंत तर दुपारनंतर वादळी पावसाचा अंदाज
१६ मे रोजी तापमान ४१ अंशपर्यंत तर वातावरण काही अंशी ढगाळ राहील
१७ मे रोजी तापमान ४२ अंशपर्यंत तर वातावरण सकाळी कोरडे व सायंकाळनंतर ढगाळ
१८ मे रोजी तापमान ४३ अंशपर्यत तर कोरडे वातावरण
१९ मे रोजी ४३ अंशपर्यंत तर कोरडे वातावरण

रोटावेटरमध्ये अडकून ट्रॅक्टर चालकाचा ठार ; यावल तालुक्यातील घटना

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२४ । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे शेतात रोटावेटर करीत असताना चालकाचा तोल जाऊन पडल्याने रोटावेटरमध्ये अडकून मृत्यू झाला. विजय जानकीराम कोळी (२५) असे मृताचे नाव असून याबाबत यावल पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

डांभुर्णी येथील विजय कोळी हा रोटावेटर करीत होते. तोल जाऊन मागे पडल्याने ते रोटावेटरमध्ये अडकले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत केतन रेवा फालक यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. डांभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय कोळी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

तर वाचले असते प्राण
कोरोना काळात डांभुर्णीमध्ये एका बालकाची हत्या झाली होती. त्यातअटकेतील संशयिताला ताब्यात द्यावे, या कारणावरून नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या गुन्ह्यात संशयित म्हणून विजय कोळी याला अटक झाली होती. तो धुळे कारागृहात होता. तेथून काही महिन्यांपूर्वी पॅरोल रजेवर घरी आला
होता. रजा संपल्यावर तुरुंगात न गेल्याने गेल्या आठवड्यात पोलिसांनी त्यास नोटीस दिली होती. यानंतर तो तुरूंगात गेला असता तर आज कदाचित जिवंत असता.

पदवीधरांसाठी खुशखबर! मुंबई उच्च न्यायालयांतर्गत लिपिक पदांसाठी बंपर भरती

0

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असले तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. मुंबईतील उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूर शहरातील उच्च न्यायालयात लिपीक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. Bombay High Court Bharti

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 : Bombay High Court Recruitment

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा 09 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर खंडपीठ
अर्ज शुल्क : ₹200/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2024

जाहिरात (Notification): पाहा

मुंबई, पुणे येथून बालेश्वर दरम्यान धावणार विशेष एक्स्प्रेस ; भुसावळसह या स्थानकांवर थांबा

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२४ । उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई व पुणे ते बालेश्वरदरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-बालेश्वर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी ०१०५५ (२ फेऱ्या) १८ मे रोजी ११ वाजून ५ मिनिटांनी मुंबई येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी बालेश्वर येथे पोहोचेल.

०१९५६ सुपरफास्ट विशेष गाडी रोजी ९ वाजून ३० मिनिटांनी बालेश्वर येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी वाजता सीएसएमटी मुंबई येथे पोहोचेल. या गाड्यांना दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, सक्ती, रायगडा, झारसुगुडा, राउरकेला, क्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर असा थांबा आहे.

पुणे-बालेश्वर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी ०१४५१ (२ फेन्या)
१८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता बालेश्वर येथे पोहोचेल. ०१४५२ विशेष गाडी २० रोजी सकाळी ९ वाजता बालेश्वरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. दरम्यान दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, सक्ती, रायगडा, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर या ठिकाणी थांबेल.

सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलांचे दर झाले कमी ; पहा काय प्रति किलोचा दर

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२४ । दैनंदिन वापरातील जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढल्यामुळे जनता होरपळून निघत असून अशातच दिलासा देणारी एक बातमी आहे. खाद्यतेलांचे दर कमी झाले. गेल्या महिन्यात वाढ झाल्यानंतर आता खाद्यतेलाची दर खाली आहे. यामुळे महागाईतही सामान्यांना अल्प दिलासा मिळत आहे.

सर्वाधिक विक्रीच्या सोयाबीन खाद्यतेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे काही महिन्यांपासून ३०० रुपयांची घसरण झाली. किरकोळमध्ये प्रति किलो भाव ११० रुपयांवर आहेत. तर शेंगदाणा तेल १७० रुपयांपर्यंत उतरले आहे.जून अखेरपर्यंत लग्नकार्य नसल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे.

केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम या तेलाची आयात वाढली. शिवाय यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढले आहे. शिवाय विदेशातील उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. मलेशिया, इंडोनिशियात पाम, ब्राझील, कॅनडा, अर्जेटिनामध्ये सोयाबीन आणि रशिया व युक्रेन देशात सूर्यफूलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्यामुळेच खाद्यतेलाचे दर घसरून तीन वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर आले आहेत. दुसरीकडे शेंगदाण्याची निर्यात वाढल्यामुळे देशांतर्गत या तेलाचे दर कमी प्रमाणात घसरले.

खाद्यतेल सध्याचे भाव तीन महिन्यापूर्वीचे भाव
सोयाबीन ११० -१२०
सूर्यफूल १२०- १३०
राईस ब्रान ११० -१२०
पाम ११० -१२५
मोहरी १४०- १५०
जवस १२०- १३०
शेंगदाणा १७०- १७५