लाच भोवली ! ग्रामसेवकासह शिपाई जळगाव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

मे 16, 2024 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२४ । मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत शिपायाला ६ हजाराची लाच घेताना जळगाव येथील लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. मनोज सूर्यकांत घोडके असे ग्रामसेवकाचे नाव असून सचिन अशोक भोलाणकर असे शिपाईचे नाव आहे. या कारवाईने खळबळ उडाली.

lach jpg webp

राजुरा येथील तक्रारदाराने आईच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ग्रामपंचायत दप्तरी मुलाचे नाव फेरफार करण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र ती फेरफार करण्यासाठी ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके याने तक्रारदारास ११ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती.

राजुरा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके आणि शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी तक्रारदाराकडून ठरलेल्या ११ हजारांपैकी सहा हजारांची लाच स्वीकारली.त्याच वेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्यावर झडप घालून लाच स्वीकारलेली सहा हजारांची रक्कम हस्तगत करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पर्यवेक्षक अधिकारी म्हणून लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पो. नि. अमोल वालझाडे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो. ना. बाळू मराठे, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पो. ना. किशोर महाजन, पो. कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी, पो. कॉ. सचिन चाटे यांच्या पथकाने कारवाई केली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now