⁠ 
सोमवार, मे 27, 2024

सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलांचे दर झाले कमी ; पहा काय प्रति किलोचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२४ । दैनंदिन वापरातील जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढल्यामुळे जनता होरपळून निघत असून अशातच दिलासा देणारी एक बातमी आहे. खाद्यतेलांचे दर कमी झाले. गेल्या महिन्यात वाढ झाल्यानंतर आता खाद्यतेलाची दर खाली आहे. यामुळे महागाईतही सामान्यांना अल्प दिलासा मिळत आहे.

सर्वाधिक विक्रीच्या सोयाबीन खाद्यतेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे काही महिन्यांपासून ३०० रुपयांची घसरण झाली. किरकोळमध्ये प्रति किलो भाव ११० रुपयांवर आहेत. तर शेंगदाणा तेल १७० रुपयांपर्यंत उतरले आहे.जून अखेरपर्यंत लग्नकार्य नसल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे.

केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम या तेलाची आयात वाढली. शिवाय यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढले आहे. शिवाय विदेशातील उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. मलेशिया, इंडोनिशियात पाम, ब्राझील, कॅनडा, अर्जेटिनामध्ये सोयाबीन आणि रशिया व युक्रेन देशात सूर्यफूलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्यामुळेच खाद्यतेलाचे दर घसरून तीन वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर आले आहेत. दुसरीकडे शेंगदाण्याची निर्यात वाढल्यामुळे देशांतर्गत या तेलाचे दर कमी प्रमाणात घसरले.

खाद्यतेल सध्याचे भाव तीन महिन्यापूर्वीचे भाव
सोयाबीन ११० -१२०
सूर्यफूल १२०- १३०
राईस ब्रान ११० -१२०
पाम ११० -१२५
मोहरी १४०- १५०
जवस १२०- १३०
शेंगदाणा १७०- १७५