⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024

सर्वसमावेशक प्रगतीचा अर्थसंकल्प : ना. गुलाबराव पाटील

0
gulabrao patil

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज विधीमंडळात मांडलेला अर्थसंकल्प हा समाजाच्या सर्व स्तरांमधील जनतेच्या हिताचा असून एकप्रकारे सर्वसमावेश प्रगतीचा संकल्प सरकारने मांडला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी आज विधीमंडळात राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प जाहीर केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पातील सर्व तरतुदींचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस आहे. जगाचा पोशींदा असणार्‍या बळीराजाला तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाची योजना ही शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. कृषी व कृषीवर आधारित योजनांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या असून याच्या जोडीला समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिकांना विकासाची फळे मिळावीत म्हणून तरतुदी केल्या आहेत. यात महिलांसाठी अतिशय क्रांतीकारी असे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत.

 

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, सरकारने कोविडग्रस्तांसाठी जिल्हा पातळीवर रूग्णालय आणि पोस्ट-कोविड रूग्णांना समुपदेशनाची उपलब्ध केलेली सुविधा देखील महत्वाची आहेच. तर माझ्या खात्याशी संबंधीत असणार्‍या जलजीवन मिशनच्या अंतर्गत राज्यातील घरांना नळ जोडणीचे उद्दीष्टदेखील ठेवण्यात आलेले आहे. गत वर्षी कोविडमुळे निधीत अडचणी आल्या असल्या तरी यंदा पाणी पुरवठा व स्वच्छता खात्यालाही  2533 कोटी रूपयांचा निधी मिळाला असून यातून राज्यातील कुणीही तहानलेला राहणार नाही हा विश्‍वास आहे. एकंदरीत पाहता चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाचे हित या अर्थसंकल्पातून साधले जाणार असल्याचा विश्‍वास ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

कोरोना पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र वालझरी येथील महाशिवरात्रीचा यात्रोत्सव रद्द

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोख वर काढले असून कोरोनाचे रुग्ण संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा चाळीसगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वालझिरी येथील महाशिवरात्री महोत्सव रद्द करण्यात आला आहे.  

 

चाळीसगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वालझिरी येथे रामायणकार वाल्मिकी ऋषी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर महाशिवरात्री निमित्ताने मोठी यात्रा भरते, पंचक्रोशीतील भाविक अंघोळ व दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने येतात. परंतू  या वर्षी दिनांक 11 मार्च गुरूवार रोजी महाशिवरात्री आहे. दरवर्षी श्रीक्षेत्र वालझरी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. लाखावर भाविक दर्शनासाठी येतात व शेकडो व्यावसायिक याठिकाणी दुकाने लावतात.

 

परंतु यावर्षी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यंदाचा श्री क्षेत्र वालझिरी येथे महाशिवरात्री निमित्ताने भरण्यात येणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.अ से संस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव व विश्वस्त मंडळाकडून भाविकांना कळविण्यात येत आहे.

अमळनेर येथे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार

0
honoring women for outstanding performance

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । जागतिक महिला दिनानिमित्त अमळनेर येथे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार भाजप युवा मोर्चातर्फ करण्यात आला.

भाजयुमो चा हा उपक्रम महिला भगिनींना विशेष प्रेरणादायी वाटला. प्रत्यक्ष यशस्वी महिलांपर्यंत पोहोचून हा सन्मान करण्यात आला.याअंतर्गत अमळनेर विभागाच्या प्रांताधिकारी सीमा अहिरे,महाबीजकृषी अधिकारी मोहिनी जाधव(राजपूत),डॉ.मयुरी जोशी,वैद्यकीय अधिकारी डॉ शिल्पा बोरसे,अँड.तिलोत्तमा पाटील,आधार संस्थेच्या संचालिका भारती पाटील,कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार्थी आकांक्षा पाटील,आरोग्य सेविका जयश्री बणे यांचा सत्कार जिल्हा दूध संचालिका तथा पुणे भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ.भैरवी वाघ पलांडे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच या प्रसंगी सरचिटणीस राकेश पाटील,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, राहुल चौधरी,निखिल पाटील उपस्थित होते.

रेल्वेच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू

0
crime

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । रेल्वेच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी न्यायडोंगरी ते हिरापुर डाऊन मध्य रेल्वे लाईन दरम्यान घडलीय. दरम्यान, याबाबत  ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, न्यायडोंगरी ते हिरापुर डाऊन मध्य रेल्वे लाईन खांब क्र. ३१६/२९ दरम्यान रेल्वेच्या धडकेत एका अज्ञात इसमाचे मृत्यू झाला आहे. हि घटना आज सकाळी ७:०८ वाजताच्या सुमारास घडली असून सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ह्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात स्टेशन मास्तर हिरापुर मध्य रेल्वे, चाळीसगाव यांनी फिर्याद दाखल केली आहे. ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ/२३४३ भालचंद्र पाटील हे करीत आहेत.

निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

0
Collector-Office-Jalgaon

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्वपूर्ण असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उप जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव कार्यालयाच्यावतीने निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने जळगाव जिल्हास्तरीय ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ काॅन्फरन्सव्दारे मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. राऊत बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह निवडणूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर या कार्यक्रमास मतदार आयकॉन रॅमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त, पद्मश्री निलिमा मिश्रा, दिव्यांग मतदार आयकॉन मिनाक्षीताई निकम यांच्यासह जिल्ह्यातील  मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ, माध्यमांचे प्रतिनिधी आदि ऑनलाईन उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की,  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अचूक मतदार यादी महत्वाची असते. याकरीता मतदार नोंदणी करताना ती बिनचूक असावी. यासाठी महिलांसह माध्यमांची भूमिका व योगदान महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात.

 

यावेळी मतदार नोंदणी कार्यक्रमात महत्वपूर्ण भूमिका बजावणा-या बीएलओचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाचोरा येथील बीएलओ सविता माधवराव पाटील तसेच अमळनेर येथील प्रा. जयश्री साळुंखे, तसेच एरंडोल येथील माध्यम प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सुर्यवंशी यांनी केले.

शिवाजीनगर वाशियांचे पुल व रस्त्याच्या कामासाठी आंदोलन

0
new project (4)

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । जळगाव शहरातील शिवाजीनगर पूल हा ‘टी’ किंवा ‘वाय’ आकाराचा बांधण्यात यावा आणि शिवाजीनगर ते लाकूडपेठमार्गे अवजड वाहतूक बंद करावे या मागणीसाठी आज ८ मार्च रोजी शिवाजीनगर वाशियांनी रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला. 

 

महानगर पालिकेचे शहर अभियंता अरविंद भोसले यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून येत्या सात दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन करत यांनी आंदोलन मागे घेतले.

 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवाजीनगर पुलाचे काम सुरू असल्यामुळे ममुराबादमार्गे यावल, चोपडा भागाकडे जाणारी वाहतूक शिवाजीनगर परिसरातून जात आहे. पुलाचे काम सुरू असल्यामुळे या भागातून तात्पुरती होत असलेली वाहतुक धोकादायक झाली आहे. परंतु पुलाच्या कामामुळे नागरिक हे सहन करीत आहे. पुलाचे टी आकाराचे  काम असल्यामुळे तात्पुरती ही वाहतूक असल्यामुळे सांगण्यात आले होते.

 

मात्र आता पुलाचा ‘टी’ आकार रद्द करून तो ‘एल’ आकाराचा करण्यात येत आहे. शिवाजीनगर ते लाकूडपेठ मार्गे ममुराबादकडे जाणारी वाहतुक कायम ठेवण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे. शिवाजीनगर हा अत्यंत रहदारीचा व दाट वस्तीचा भाग असून सध्या तात्पुरती सुरू असलेल्या मार्गावर मोठमोठी अवजड वाहने जात आहे. जर हा मार्ग कायम झाला तर महामार्गाची मोठी वाहने या भागातून जातील, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताचा धोका निर्माण होईल, तसेच धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहे.

पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

0
women's day celebrations at pachora police station

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने महिला पोलिस पाटील, महिला दक्षता समिती सदस्य व महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, महिला पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे, पत्रकार प्रविण ब्राह्मणे, अनिल येवले यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रा. सुनिता मांडोळे, प्रवीण ब्राह्मणे व पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा मांडोळे यांनी महिला दिनाचे महत्व विषद करत महिलांना माणूस म्हणून समाजाने वागणूक देण्याची गरज असल्याचे सांगत सर्वच क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांपेक्षा दोन पाऊल पुढे मार्गक्रमण केल्याचे सांगत पोलीस बांधवानी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. तर पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी विद्यार्थिनी, गृहिणी वृध्द महिला यांना केव्हाही काहीही सुरक्षेशी अडचण वाटल्यास आमच्याशी संपर्क करावा आम्ही आपल्या सेवेत आहोत असे सांगत उपस्थित महिलांना महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या तर प्रवीण ब्राह्मणे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे महिला पोलीस हवालदार शारदा भावसार महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती बोरसे, वैशाली मराठे,महिला पोलीस पाटील व महिला दक्षता समिती सदस्या प्रा. वैशाली बोरकर, मिनाक्षी दिवटे, प्रा. सुनिता मांडोळे, वर्षा ब्राह्मणे, संगीता नेवे यांची उपास्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस हवालदार प्रकाश पाटील यांनी केले तर आभार गोपनीय विभागाचे सुनील पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी राहुल बेहरे, किरण पाटील आदींनी सहकार्य केले.

अंबे वडगाव येथील पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला भीषण आग ; ६० लाखाचे नुकसान

0
pck cotton ginning fire at ambe wadgaon

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव  पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला भीषण आग लागून आगीत अंदाजे साठलाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पी.सी.के.कॉटन जिनिंगमध्ये ढेपच्या गोडाऊनमध्ये चार हजार ढेपची पोती भरलेले होती. परंतु आज सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास या गोडाऊनमधुन धुरांचे लोट निघत असतांना दिसू लागले व आग लागल्याचे लक्षात येताच या परिस्थीतीची दखल घेत लगेचच जिनिंगच्या संचालकांनी पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला कळवले असता पाचोरा नगरपालिकेचा अग्निशामक बंब त्वरित आला व आग विझवण्याचे काम सुरु झाले. तसेच ग्रामस्थांनी जिनिंगकडे धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु तेलयूक्त ढेप असल्याने आग भडकली सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान लागलेली आग विझवण्यासाठी सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रयत्न सुरु होते.

 

या ठिकाणी चारहजार ढेपची पोती ठेवण्यात आलेली होती अशी माहिती मिळाली असून, ही आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर ढेप जळाली तसेच आग विझविण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागल्याने संपूर्ण ढेप पाण्यात भिजल्याने तसेच ढेपची पोती आगीतून वाचवण्यासाठी जलद गतीने जेसीबीच्या साह्याने बाहेर काढावी लागल्याने जवळपास साठलाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वरचे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थीतीची पहाणी केली असल्याचे समजते.

बीएचआरचे नवे अवसायक चैतन्य नासरे आज पदभार स्वीकारणार

0
bhr incumbent chaitanya nasare will take charge today

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे नवे अवसायक म्हणून चैतन्य नासरे हे आज सोमवारी पदभार स्वीकारणार आहे. 

 

बीएचआरचे या आधीचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह इतरांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्यानंतर हे पद रिक्तच होते. जानेवारी महिन्यात कंडारे यांची मुदत संपण्याच्या काही दिवस आधी केंद्र सरकारने नासरे यांची नियुक्ती केली, मात्र नासरे यांना राज्य सरकारने अद्याप मुक्त केले नव्हते. त्यामुळे ते रुजू होऊ शकले नव्हते. आता नासरे रुजू होणार आहेत.

 

नासरे हे हिंगणा, जि. नागपूर येथे सहायक निबंधक म्हणून कार्यरत होते. त्यांनी या आधी समता सहकारी बँक, नागपूरचे मुख्य अवसायक, आणि द नागपूर महिला नागरी सहकारी बँकेच्या अवसायक बोर्डाचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे.