⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने महिला पोलिस पाटील, महिला दक्षता समिती सदस्य व महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, महिला पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे, पत्रकार प्रविण ब्राह्मणे, अनिल येवले यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रा. सुनिता मांडोळे, प्रवीण ब्राह्मणे व पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा मांडोळे यांनी महिला दिनाचे महत्व विषद करत महिलांना माणूस म्हणून समाजाने वागणूक देण्याची गरज असल्याचे सांगत सर्वच क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांपेक्षा दोन पाऊल पुढे मार्गक्रमण केल्याचे सांगत पोलीस बांधवानी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. तर पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी विद्यार्थिनी, गृहिणी वृध्द महिला यांना केव्हाही काहीही सुरक्षेशी अडचण वाटल्यास आमच्याशी संपर्क करावा आम्ही आपल्या सेवेत आहोत असे सांगत उपस्थित महिलांना महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या तर प्रवीण ब्राह्मणे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे महिला पोलीस हवालदार शारदा भावसार महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती बोरसे, वैशाली मराठे,महिला पोलीस पाटील व महिला दक्षता समिती सदस्या प्रा. वैशाली बोरकर, मिनाक्षी दिवटे, प्रा. सुनिता मांडोळे, वर्षा ब्राह्मणे, संगीता नेवे यांची उपास्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस हवालदार प्रकाश पाटील यांनी केले तर आभार गोपनीय विभागाचे सुनील पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी राहुल बेहरे, किरण पाटील आदींनी सहकार्य केले.