⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

गीतांजली एक्स्प्रेसचा डबा रुळावरून घसरला

0
the coach of gitanjali express derailed

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । हावडाहून मुंबईकडे जाणार्‍या 02260 गीतांजली एक्स्प्रेसचा एक डबा (जनरेटर व्हॅन) रुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास बोरगाव मंजू ते काटेपूर्णा दरम्यान घडली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या अपघातामुळे अप व डाऊन लाईनवरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली आपल्या नियमित वेळेवर धावत असताना सकाळी 11.15 वाजताचे दरम्यान काटेपूर्णा ते बोरगाव मंजू रेल्वे स्थानकादरम्यान आली असता या गाडीचा शेवटचा जनरेटर डबा (एसएलआर) अचानक रुळावरून घसरला. डबा घसरताच रेल्वे थांबली. रेल्वे अधिकारी व रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बिग ब्रेकिंग : जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२०२१ । कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी जळगाव महानगरपालिका क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु लागू करण्यात आला असून नागरिकांनी त्यांचे स्वयंस्फुर्तीने पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री.राऊत म्हणाले, गुरुवार 11 मार्च रात्री 8 वाजेपासून 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यु राहील. या कालावधीत शहरातील बाजारपेठा बंद राहतील. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. तसेच समाजसेवी संस्था, व्यापारी संस्था आणि लोकप्रतिनिधीनीदेखील याबाबतची मागणी केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा किंवा इतर शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित परीक्षा पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार होतील. परीक्षार्थींना अडचण होणार नाही. याबाबतची दक्षता घेण्यात येईल. सोमवारी सर्व दुकाने उघडण्यात येणार असून नागरीकांनी पुढील दोन दिवस गर्दी करु नये, तसेच वस्तुंचा साठा करु नये.

लसीकरण कार्यक्रम नियोजनानुसार सुरु राहील. सर्व निर्बंध जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी असून आवश्यकतेनुसार तालुकास्तरावर त्यांची अंमलबजावणी नंतर करण्यात येईल. राज्यातील इतर भागातून होणारी प्रवासी वाहतूक सुरु राहील.

टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनाची सेवा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरीता तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी याचे वाहने आणि परीक्षार्थीं विद्यार्थ्यांसाठी राहील. हॉस्पिटल, ओपीडी व रुग्णवाहिका सेवा सुरु राहतील. सर्व प्रकारची रुग्णालये, औषधांची दुकाने सुरु राहतील. दुध खेरदी-विक्री केंद्रे, कृर्षी, आणि औद्योगिक आस्थापना सुरु राहतील. शासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थितीने सुरु राहतील.

पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनासाठी सुरु राहतील. रेल्वे,‍ विमानसेवा, मालवाहतुक सुरु राहील. तसेच कुरीयर,गॅरेज, वर्कशॉप, वृत्तपत्र, मिडीया सेवा,बँका व वित्तीय संस्था, पोस्टल सेवा,पशुखाद्य केंद्रे, पशुवैद्यकीय सेवा सुरु राहतील.

शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी क्लासेस, बाजारपेठेतील दुकाने बंद राहतील.सर्व प्रकारचे हॉटेल बंद राहतील, मात्र पार्सल सेवा सुरु राहील. किरकोळ भाजीपाला आणि फळ विक्री, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय ,खाजगी बांधकामे (मान्सून पूर्व कामे वगळून ) शॉपीग मॉल, मार्केट, किराणा दुकाने तसेच सर्व दुकाने, लिकर शॉप तसेच शॅाप, स्पा, सलून, खाजगी कार्यालये, गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, नाट्यगृहे, क्रिडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रदर्शने, मेळावे, संमेलन,आठवडी बाजार, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहील असे त्यांनी सांगितले.

ज्या विशिष्ट प्रवर्गाना जनता कर्फ्यु मधुन सुट देण्यात आलेली आहे. त्यांनी आपले सोबत कार्यालयाचे, आस्थापनाचे, शाळा, महाविद्यालयाचे ओळखपत्र तसेच 14 मार्च रोजी होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिक्षेचे हॉल तिकिट सोबत बाळगणे अनिवार्य राहील असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

डॉ. मुढे म्हणाले जनता कर्फ्यु दरम्यान नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. कोरोनाची संपर्क साखळी थांबविण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सुचनाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


हे देखील वाचा : अत्यंत महत्त्वाचे : जनता कर्फ्यू दरम्यान जळगावात काय राहणार सुरु? काय राहणार बंद? घ्या जाणून….

कोरोना पार्श्वभूमीवर मुक्ताई यात्रोत्सव रद्द

0
muktabai

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर मुक्ताई यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी माघ कृ एकादशीला संत मुक्ताई मंदिर परिसरात लाखो भाविकांचा भक्तीचा मळा येथे फुलतो. यंदा मात्र यात्रोत्सव रद्द झाल्याने मंदिर परिसर सुनेसुने होते.  

 

महाराष्ट्रातील प्रमुख वारकरी संतपीठ असलेले संत मुक्ताबाई समाधीस्थळावर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे सोमवार सुरू होणारा संत मुक्ताबाई-चांगदेव माघवारी महाशिवरात्र यात्रोत्सव सुरू होणार होता. दरवर्षी माघ कृ. विजया एकादशी या यात्रोत्सवचा महत्वपूर्ण दिवस असतो. यंदा मंगळवारी ९ मार्च रोजी विजया एकादशी होती. त्या अनुषंगाने येथे होणारी भाविक वारकऱ्यांच्या गर्दी लक्षात घेता प्रशासनाने आठवड्यापूर्वीच कोरोना संसर्जन्य आजाराच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पर्शवभूमीवर हा यात्रोत्सव सोहळा रद्द करण्याचा सूचना मंदिर प्रशासनाला दिल्या होत्या. त्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.

 

संत मुक्ताबाई मंदिर व्यवस्थापनाला जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सुचनेनुसार ९ ते ११ मार्च तीन दिवस मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मानाच्या दिंड्याना आधी दिलेली परवानगीदेखील प्रशासनाने रद्द केली होती. मोठ्या प्रयत्नाअंती मनाच्या पाच दिंड्याना मंदिरात जाण्याची परवानगी मिळाली. यात वारकरी फडकरी कीर्तन महासंघ, गोमाजी महाराज संस्थान नागझिरी, या सह अन्य तीन मनाच्या दिंड्यानी मुक्ताई दरबारात हजेरी लावली होती तर मुक्ताई मंदिराकडे भाविकांनी येवू नये, म्हणून पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.

दुर्दैवी…हळदीच्या दिवशीच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
crime

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । लग्नाची घटीका एक दिवसावर असताना पेठमधील वधुपित्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हळदीच्या दिवशीच घडल्याने आनंदावर विरजण पडले आहे. सुपडू बळीराम पाटील (४५) असे मृत  वधुपित्याचे नाव आहे.

 

पेठमधील रहिवासी व अल्पभूधारक शेतकरी सुपडू बळीराम पाटील यांची कन्या अंकिता हिचा विवाह हिवरखेडा दिगर येथील चेतन ज्ञानेश्वर होळे या युवकासोबत निश्चित झाला आहे. बुधवारी विवाह संपन्न होणार होता. मंगळवारी हळदीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. पाहुण्याची वर्दळ सुरू होती. सुपडू पाटील पाचोरा येथून घरी येणार होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते.

 

सुपडू पाटील यांचा पाचोरा येथेच हृदय विकाराने मृत्यू झाला. बातमी लगीनघरी धडकताच आंनदाचे वातावरण शोकाकुल वातावरणात रूपांतरित झाले. कन्या बाेहल्यावर चढण्यापूर्वीच पित्याचे अंत्यदर्शन घेण्याची दुर्दैवी प्रसंग अंकिता व परिवारावर ओढावल्याने उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

 

 

सुपडू पाटील अल्पभूधारक शेतकरी असून कामानिमित्त पाचोरा येथे होते, परिस्थिती जेमतेम आहे. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारा परिवार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी विशाल पाटील याचे ते वडील आहेत. घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने परिवार उघड्यावर आला आहे.

डांभुर्णीत अवैध वाळू वाहतूक करणार ट्रॅक्टर पकडलं

0
caught tractor transporting illegal sand

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे महसुलच्या भरारी पथकाने धडक कारवाई करीत तापी नदीच्या पात्रातुन अवैध मार्गाने वाळु वाहतुक करतांना एका ट्रॅक्टरला पकडण्यात आले आहे. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, डांभुर्णी तालुका यावल येथे आज ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार आणी फैजपुर मंडळाचे तलाठी प्रशांत जावळे, आमोदे येथील तलाठी एम.पी.खुर्दा, आडगावचे तलाठी आर.के.गोरटे, वाहनचालक हिरामण सावळे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ट्रॅक्टर मालक साहेबराव मच्छिंदर सोळुंके रा. कोळन्हावी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एपी ७४९७) ट्रॉलीचा क्रमांक नाही.

याव्दारे तापी नदीच्या पात्रातुन अवैधरित्या वाळुची वाहतुक करतांना आढळून आले आहे. महसुलच्या पथकाने कारवाई करीत ट्रॅक्टर ताब्यात घेवुन यावल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. दरम्यान यावल तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याने त्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

राजेंद्र चौधरी यांची भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण तालुकाध्यक्षपदी निवड

0
rajendra chaudhary

 

 भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण तालुका अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे धानोरा ता.चोपडा येथील पत्रकार यांची तर तालुका संपर्क प्रमुखपदी खान्देश अस्मिता न्यूजचे पत्रकार जितेंद्र कोळी यांची एकमताने निवड करण्यात आली.

 

त्यांचे सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,सहकार क्षेत्रासह पत्रकारितेत उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिग राजपुत,केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील,केंद्रीय उपाध्यक्ष,राकेश कोल्हे,जयवंत देवरे(दिल्ली),प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी(धुळे),प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार जैन,केंद्रीय सचिव प्रकाश कासार,जिल्हा उपाध्यक्ष विश्राम तेले, जिल्हा उपाध्यक्ष (पश्चिम विभाग) नारायण साळुंखे,जिल्हा कार्याध्यक्ष (शहर) महेंद्र पाटील,ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी,प्रविण कोळी,तालुका अध्यक्ष(शहर)गणेश बेहेरे,कार्यकारी अध्यक्ष सुनील पाटील,उमवि अध्यक्ष छोटू वारडे,एरंडोल तालुका अध्यक्ष नितीन ठक्कर,धरणगाव तालुका अध्यक्ष कडू महाजन,पारोळा तालुका अध्यक्ष दिलीप सोनार,सरचिटणीस किरण देवराज,उपाध्यक्ष परेश पालिवाल,सह चिटणीस यासु बारेला,कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील,कार्याध्यक्ष रोहिदास मोरे,गणेश कोळी(उत्राण),कांतीलाल पाटील,डॉ.रवींद्र कोळी,प्रशांत चौधरी आदींनी अभिनंदन केले आहे.

नगरदेवळा येथे कोरोना लसीकरण ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ

0
nagardevala

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे कोरोना लसीकरण ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. 

 

देशभरात कोविड १९ लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून यामध्ये सामान्य व्यक्तींनाही करोना लस घेता येणार आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे.  यासाठी पात्र नागरिकांना को – विन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

दि. ८ मार्च रोजी या कोरोना लसीकरण ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ नगरदेवळा ता. पाचोरा येथे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य वसंत गायकवाड, सरपंच प्रतीक्षा काटकर, वैद्यकीय अधिकारी योगेश बसेर व आरोग्य कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले. कोविड लस मिळविण्यासाठी तुम्हाला फोटो आय.डी. पुराव्यासह ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. ऑन दि स्पॉट कोणतीही नोंदणी होणार नाही. लस कुठल्या केंद्रावर टोचून घ्यायची, याचे केंद्रही आपण स्वत:च निवडू शकणार आहेत. लसीचे दोन्ही डोस केव्हा दिले जातील याचा एस. एम. एस. पाठविला जाईल. २८ दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन नगरदेवळा वैधकीय अधिकारी डॉ. विरेंद्र पाटील, योगेश बसेर यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचा व्यापारी संकूलात ‘सर्जिकल स्ट्राईक’

0
action taken by collector and sp (1)
कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे रस्त्यावर उतरले

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विना मास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यांना जिल्हारिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांनी जोरदार दणका दिला आहे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे चक्क रस्त्यावर उतरले. सकाळी दहा ते बारा दरम्यान शहरातील सर्व व्यापारी संकूलात फिरून त्यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला. तर पन्नास जणांवर विना मास्क फिरणे व सामाजीक अंतर न पाळणे याप्रकरणी जागेवरच दंडही केला आहे.

action taken by collector and sp
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी अचानक कारवाई सुरु केल्याने व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली

जिल्‍हाधिकारी राऊत हे स्‍वतः रस्‍त्‍यावरव उतरल्‍याने धावपळ सुरू झाली होती. फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, चित्रा टॉकीज परिसर, नवीपेठ, गोलाणी मार्केट परिसरात फिरून विना मास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यांवर जागेवरच कारवाई केली. श्री.राउत, डॉ.मुंडे यांनी व्यापाऱ्यांना विना मास्क येणाऱ्यांना माल देवू नका अशी सूचना केली आहे.

action taken by collector and sp (2)
पन्नास जणांवर विना मास्क फिरणे व सामाजीक अंतर न पाळणे याप्रकरणी जागेवरच दंड

कोरोना बाधीतांची संख्या जळगाव शहरात सर्वाधिक आहे. नागरिक विना मास्क फिरताहेत, गर्दी करताताहेत, सामाजीक अंतर पाळत नाही यामुळे कोरोना संसर्ग जलद गतीने वाढतोय. आज सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त वाहुळे, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, तहसिलदार नामदेव पाटील, मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी व पोलिस कर्मचारी उपस्‍थित होते.

वाळूची वाहतूक करणार्‍या भरधाव डंपरची दुचाकीला धडक; एकाचा जागेवरच मृत्यू

0
accident logo

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । वाळूची वाहतूक करणार्‍या भरधाव वेगाने धावणार्‍या डंपरनी आजवर शहरात अनेक बळी घेतले असून आज पुन्हा एक बळी गेला आहे. सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी जळगाव शहरातील इच्छादेवी नजीक घडली आहे. 

सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (वय ५५, रा. आंबेडकर वसतीगृह, सिंधी कॉलनी रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर अक्षय विजय पाटील (३०, रा. वढोदा, ता. चोपडा; ह.मु. शिवमनगर, जळगाव) याला गंभीर दुखापत झाली आहे.  या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

याबाबत थोडक्यात असे की, सिध्दार्थ मोरे हे रेमंडमध्ये प्रॉडक्शन विभागात नोकरीला आहेत. ते रेमंडमधील सहकार्‍यासोबत दररोज कामावर जात होते. या अनुषंगाने आज सकाळी त्यांना अक्षय पाटीलहे सहकारी त्यांना घेण्यासाठी सिंधी कॉलनी भाजीपाला मार्केट येथे आले. येथून दोन्ही जण दुचाकीने रेमंड कंपनीत जात असतांना इच्छादेवी चौकाच्या पुढे असणार्‍या सिध्दीविनायक हॉस्पीटलजवळ महामार्गावर अक्षय पाटील चालवत असलेल्या दुचाकी एमएच१९ सीसी ६७७७ क्रमांकाच्या दुचाकीला एमपी ०४ जीए ३४९२ या क्रमांकाच्या डंपरने मागून उडविले. यात दुचाकीच्या मागे बसलेले सिध्दार्थ त्र्यंबक मोरे हे जागीच ठार झाले असून अक्षय पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. मोरे यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुले आहेत.