⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

वाळूची वाहतूक करणार्‍या भरधाव डंपरची दुचाकीला धडक; एकाचा जागेवरच मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । वाळूची वाहतूक करणार्‍या भरधाव वेगाने धावणार्‍या डंपरनी आजवर शहरात अनेक बळी घेतले असून आज पुन्हा एक बळी गेला आहे. सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी जळगाव शहरातील इच्छादेवी नजीक घडली आहे. 

सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (वय ५५, रा. आंबेडकर वसतीगृह, सिंधी कॉलनी रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर अक्षय विजय पाटील (३०, रा. वढोदा, ता. चोपडा; ह.मु. शिवमनगर, जळगाव) याला गंभीर दुखापत झाली आहे.  या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

याबाबत थोडक्यात असे की, सिध्दार्थ मोरे हे रेमंडमध्ये प्रॉडक्शन विभागात नोकरीला आहेत. ते रेमंडमधील सहकार्‍यासोबत दररोज कामावर जात होते. या अनुषंगाने आज सकाळी त्यांना अक्षय पाटीलहे सहकारी त्यांना घेण्यासाठी सिंधी कॉलनी भाजीपाला मार्केट येथे आले. येथून दोन्ही जण दुचाकीने रेमंड कंपनीत जात असतांना इच्छादेवी चौकाच्या पुढे असणार्‍या सिध्दीविनायक हॉस्पीटलजवळ महामार्गावर अक्षय पाटील चालवत असलेल्या दुचाकी एमएच१९ सीसी ६७७७ क्रमांकाच्या दुचाकीला एमपी ०४ जीए ३४९२ या क्रमांकाच्या डंपरने मागून उडविले. यात दुचाकीच्या मागे बसलेले सिध्दार्थ त्र्यंबक मोरे हे जागीच ठार झाले असून अक्षय पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. मोरे यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुले आहेत.