⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचा व्यापारी संकूलात ‘सर्जिकल स्ट्राईक’

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचा व्यापारी संकूलात ‘सर्जिकल स्ट्राईक’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विना मास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यांना जिल्हारिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांनी जोरदार दणका दिला आहे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे चक्क रस्त्यावर उतरले. सकाळी दहा ते बारा दरम्यान शहरातील सर्व व्यापारी संकूलात फिरून त्यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला. तर पन्नास जणांवर विना मास्क फिरणे व सामाजीक अंतर न पाळणे याप्रकरणी जागेवरच दंडही केला आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे यांनी अचानक कारवाई सुरु केल्याने व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली

जिल्‍हाधिकारी राऊत हे स्‍वतः रस्‍त्‍यावरव उतरल्‍याने धावपळ सुरू झाली होती. फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, चित्रा टॉकीज परिसर, नवीपेठ, गोलाणी मार्केट परिसरात फिरून विना मास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यांवर जागेवरच कारवाई केली. श्री.राउत, डॉ.मुंडे यांनी व्यापाऱ्यांना विना मास्क येणाऱ्यांना माल देवू नका अशी सूचना केली आहे.

पन्नास जणांवर विना मास्क फिरणे व सामाजीक अंतर न पाळणे याप्रकरणी जागेवरच दंड

कोरोना बाधीतांची संख्या जळगाव शहरात सर्वाधिक आहे. नागरिक विना मास्क फिरताहेत, गर्दी करताताहेत, सामाजीक अंतर पाळत नाही यामुळे कोरोना संसर्ग जलद गतीने वाढतोय. आज सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त वाहुळे, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, तहसिलदार नामदेव पाटील, मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी व पोलिस कर्मचारी उपस्‍थित होते.

author avatar
Tushar Bhambare