⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

0
kulbhushan patil shivsena

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । चेतन वाणी | शहरातील भाजप, एमआयएमचे नगरसेवक कालपासून गायब असून सोमवारी सकाळी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी देखील जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जळगाव मनपात सत्तांतर करण्याच्या हालचाली जोरात सुरू असून मुंबईहुन सर्व सूत्रे हलवली जात आहे. जळगाव लाईव्ह न्यूजकडे भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी गौप्यस्फोट केला असून सर्व सूत्रे कशी हालली याची माहिती दिली आहे.

आठ दिवसांपूर्वी झाली मुख्यमंत्र्यांकडे बैठक

जळगावचे आमदार राजुमामा भोळे हे नेहमी दुजाभाव करतात, आमदार निधीतील कामे देत नाही, सर्वांना विश्वासात घेत नसल्याने कंटाळून काही भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. आठ दिवसापूर्वी नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, चेतन सनकत, गजानन देशमुख, सुधीर पाटील, कुंदन काळे यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर याबाबत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी देखील याविषयी चर्चा करण्यात आली होती.

जयश्री महाजन महापौर, कुलभूषण पाटील उपमहापौर

शिवसेनेने खेळलेला डाव यशस्वी झाला तर शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे कुलभूषण पाटील हे उपमहापौर म्हणून निश्चित मानले जात आहे. भाजपातून शिवसेनेत जात असलेले भाजप नगरसेवक सध्या मुंबईत असून त्यांनी आमदारांबद्दल असलेली यापूर्वीच पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली होती. वरिष्ठांनी निर्णय न घेतल्याने त्यांनी गेल्या महिन्यात देखील मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याची माहिती नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली आहे.

 हे देखील वाचा : 

बिग ब्रेकिंग : जळगावात राजकीय उलथापालथ : माजी मंत्री आ.गिरीष महाजन मुंबई रवाना!

महापौर निवडणुकीत ट्विस्ट : शिवसेनेने दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव महानगरपालिकेत विरोधकांचा घोडेबाजार; गिरीश महाजनांची टीका

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

जळगाव महानगरपालिकेत विरोधकांचा घोडेबाजार; गिरीश महाजनांची टीका

0
girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेतील राजकारण चांगलेच तापले असून नगरसेवक फुटीच्या भीतीने सत्ताधारी भाजप गोटात चांगलीच तारांबळ उडाली आहे. भाजपचे २० पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेसोबत जात असल्याने सत्तानंतर होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावरून माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी विरोधकांवर ‘घोडेबाजार’ सुरु असल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान, जळगाव मनपावर सेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी शिवसेनेसह आघाडीकडून नवीन डाव खेळला जात आहे. भाजपचे २५ पेक्षा जास्त नगरसेवक तळाला लागले असल्याचे सेना नेत्यांनी स्पष्ट केले असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावर आ. महाजन म्हणाले की, जे गेले आहेत ते परत येतील. पक्षा विरोधात काम केल्यास सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई अटळ आहे, असेही ते म्हणाले आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्यावर काही नगरसेवकांची नाराजी असल्याबाबत बोललं जात आहे. यावर बोलताना गिरीश महाजन की होय… काही लोकांची नाराजी असू शकते… सर्वांचेच समाधान नाही होऊ शकत.. नाराजी चालूच असते मग राजुमामा बद्दल असो किंवा माझ्याबद्दल… तिथे राजूमामा उभे नाहीत, पक्ष उभा आहे.

सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी नाही असा आरोप देखील होत आहे याबाबत स्पष्टीकरण देतांना आ. महाजन म्हणाले की विकासाचा मुद्दा नाहीच…आता अंडरग्राउंड ड्रेनेज झालेले आहे, पाणी पुरवठा योजना,100 कोटींच्या कामांची वर्क ऑर्डर झाली असून पुढील आठ पंधरा दिवसात कामे सुरु होतील त्यामुळे हा काही विषय नाही.

हे देखील वाचा:

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

आ.राजुमामा भोळेंमुळे फुटणार भाजप?

बिग ब्रेकिंग : जळगावात राजकीय उलथापालथ : माजी मंत्री आ.गिरीष महाजन मुंबई रवाना!

जामनेरात शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ

0
launch of government shopping center at jamner

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । जामनेर शहरातील शेतकरी सहकारी संघाच्या आवारात तुर आणी हरबरा (चना) शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी काटा पुजन करून शुभारंभ केला.

आतापर्यंत तालुकाभरातुन सुमारे १६०० वर शेतकऱ्यांनी आपल्या मालाची ऑनलाईन नोंदणी केली असून तुरीला ६००० तर हरबरा ५१०० रूपये प्रती क्विंटलने खरेदी करण्यात येईल, अशी माहिती शेतकीसंघाचे सभापती चंद्रकांत बावीस्कर यांनी यावेळी दिली.

शुभारंभ प्रसंगी शेतकीसंघाचे सभापती चंद्रकांत बावीस्कर,उपसभापती बाबुराव गवळी तर संचालकांमधे डॉ सुरेश पाटील, रंगनाथ पाटील,रमेश नाईक, डॉ भरत पाटील, डोंगरसींग नाईक, बिरबलदादा पाटील, नाना पाटील, प्रभाकर पाटील, व्यवस्थापक गोपाळ पाटील यांचेसह शेतकरी-कर्मचारी उपस्थित होते.

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

0
lalit kolhe sunil mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहराचे माजी महापौर, सभागृह नेता ललित कोल्हे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केल्याने जयश्री महाजन यांची महापौर पदाची संधी हुकली आणि जिवलग असलेली कोल्हे-महाजन जोडी फुटली होती. दोघांमधील दुरावा दूर होण्याची संधी चालून आली असून सुनील महाजन यांच्या मैत्री खातर ललित कोल्हे पुन्हा घर वापसी करत सेनेचा धागा मनगटावर बांधणार असल्याचे निश्चित झाले आहे.

जळगाव शहरात ललित कोल्हे आणि सुनील महाजन या जोडीच्या मैत्रीची चर्चा नेहमी होत होती. सुनील महाजन यांच्या मैत्रीमुळेच ललित कोल्हे मनसेतून शिवसेनेत दाखल झाले होते. सेनेकडून उमेदवारी निश्चित झालेली असताना ऐनवेळी ललित कोल्हे भाजपात दाखल झाले आणि तिथेच मैत्रीत दुरावा आला. ललित कोल्हे यांच्यासह त्यांचे सर्व नगरसेवक सेनेत आल्याने सेनेची ताकद वाढणार होती आणि महापौर पदाच्या दावेदार मानल्या जाणाऱ्या जयश्री महाजन यांचे पद जवळपास निश्चित झाले होते. कोल्हे यांच्या प्रवेशाने केवळ शिवसेना नेतेच दुखावले नाही तर दोन मित्रांमध्ये दुरावा देखील निर्माण झाला होता.

मैत्रीची ऋण फेडण्यासाठी शिवबंधन

महाजन-कोल्हे जोडीत पडलेली फूट दूर करण्याची संधी नुकतेच चालून आली आहे. जळगाव मनपात सत्तांतरच्या चर्चा सुरू असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपचे अनेक नगरसेवक नॉट रीचेबल आहे त्यातच सेनेने महापौर पदाचा उमेदवार म्हणून जयश्री महाजन यांची उमेदवारी जाहिर केली आहे. आपल्या मैत्रीला जागण्याची हीच नामी संधी असून मैत्रीचे ऋण फेडण्यासाठीच ललित कोल्हे मनगटावर शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत. ललित कोल्हे यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून त्यांच्या सूत्रांनी तशी माहिती जळगाव लाईव्ह न्यूजला दिली आहे.

अर्धांगिनीची भूमिका ठरली महत्वाची

माजी महापौर तथा भाजप मनपा सभागृह नेते ललित कोल्हे हे गेल्यावर्षीच शिवसेनेच्या सरिता माळी यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले आहे. ललित कोल्हे जरी बाहेर शरीराने भाजपचे असले तरी घरी मात्र ते मनाने शिवसेनेचे होऊ लागले होते. ललित कोल्हे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी आणि मैत्रीतील गोडवा पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांच्या अर्धांगिनी सरिता माळी-कोल्हे यांनीच महत्वाची भूमिका निभावली असे बोलले जात आहे.

उद्यापासून जामनेरात चार दिवसांचा जनता कर्फ्यू ; काय खुलं, काय राहणार बंद?

0
jamner janta carfew

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामनेर शहरात मंगळवार ते शुक्रवार असे 4 दिवसांचा “जनता कर्फ्यू”लागू करण्याचा निर्णय माजी मंत्री आ. गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकित घेण्यात आला आहे.  

जामनेरात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून चाचणी केलेल्या रुग्णांपैकी तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. ही परिस्थिती पहाता मंगळवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय रविवारी आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेत घेण्यात आला.

या कॅर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. त्यात दवाखाने, मेडिकल, दुध डेअरी सुरु राहणार आहे. दूध डेअरी सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत उघडी राहणार आहे. उर्वरीत सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. याची जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

“जनता कर्फ्यू ‘मध्ये सर्व जामनेर शहर वासीयांनी स्वतःहून सहभागी व्हावे आणि कोरोना” विषाणूची संक्रमित साखळी तोडण्यासाठी योगदान द्यावे,असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

कोरपावली येथे सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य तपासणी मोहीमेस सुरूवात

0
korpavali news

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । यावल तालुक्यातील कोरपावली गावात सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या माध्यमातुन आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून या तपासणी मोहीमेत गावातील महालेवाडयात चार कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण मिळुन आले आहे.

या क्षेत्रात प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषीत करण्यात आले असुन या प्रतिबंधीत क्षेत्राला सरपंच , ग्रामसेवक यांच्यासह आशा कर्मचारी यांनी बाधीत कुटुंबाच्या आरोग्याची काळजी म्हणुन भेट देवुन सविस्तर माहीती मिळवली . दरम्यान दिनांक १० मार्च रोजी सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राव्दारे वैद्यकीय अधिकारी डॉ . गौरव भोईटे , वैद्यकीय अधिकारी डॉ .नसीबा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपावली गावातील एकुण ८ कुटुंबांतील ३oजणांच्या आरोग्य तपासणीत एकुण चार जण हाय रिक्स कोरोना पॉझीटीव्ह आढळुन आले होते.

तर २४ जण हे लो रिक्स विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे मिळुन आलीत, एकुण ३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात रोग प्रतिकार क्षमता कमी असलेले ६ जण मधुमेहच्या आजाराचे १ रक्तदाब व ह्वदयरोगाचे रुग्ण ५ तर१o वर्षाखालील बालके व ५० वर्षावरील ११ व्यक्ती हे व्याधीग्रस्त मिळुन आले आहे.

कोरपावली गावाचे सरपंच विलास नारायण अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, ग्रामसेवक प्रविण सपकाळे, आशा कर्मचारी नजमा अरमान तडवी, हिराबाई सुखदेव पांडव ,हसीना सिकंदर तडवी या प्रतिबंधीत क्षेत्रावर नियमित भेट देवुन रूग्णांच्या आरोग्याची घेत आहे . त्याचप्रमाणे गावातील सरपंच विलास अडकमोल यांनी शासनाच्या व आरोग्य प्रशासनाच्या कोवीड19या आदेशाची काटेकोर अमलबजावणी ग्रामस्थांनी करून आपली आपल्या कुटुंबाच्या आणि गावाच्या ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

आ.राजुमामा भोळेंमुळे फुटणार भाजप?

0
suresh damu bhole bjp

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । शहराचे आमदार तथा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या कारभाराला कंटाळून भाजपचे काही नगरसेवक नाराज आहेत. भाजपचे नेते आ.गिरीष महाजन यांच्यासह स्थानिक नेत्यांना वारंवार सांगून देखील त्यांनी दखल न घेतल्याने काही नगरसेवक नॉट रीचेबल झाले आहेत.

जळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्याविरुद्ध नेहमी २ गट मनपात सक्रिय होते. आ.भोळे विरुद्ध अनेकवेळा त्या गटातील नगरसेवकांनी उघडपणे नाराजी देखील बोलून दाखवली होती. आ.भोळे यांच्याकडून मिळणारी वागणूक आणि केला जाणारा भेदभाव योग्य नसल्याने काही नगरसेवक नाराज होते. नाराज नगरसेवकांनी याबाबत वारंवार नेते आ.गिरीष महाजन, आ.चंदूभाई पटेल, श्रीराम खटोड यांच्याकडे नाराजी बोलून देखील दाखवली होती. सध्या महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने मनपात सत्तांतर करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या असून हीच संधी साधत भाजपचे अनेक नगरसेवक नॉटरीचेबल झाले आहेत.

जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत भारत सपकाळे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आ.राजुमामा भोळे यांच्याविरुद्ध उघडपणे नाराजी जाहीर केली. सध्या तरी शिवसेनेत कुणीही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे मात्र काही नगरसेवक नॉटरीचेबल असल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहे.

हे देखील वाचा :

माजी मंत्री आ.महाजनांसह भाजपचे नगरसेवक ‘या’ शहरात तळ ठोकून! फोटो झाले व्हायरल…

जळगावात भाजपमध्ये मोठी फूट : माजी महापौर ललित कोल्हे शिवसेनेत?

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

माजी मंत्री आ.महाजनांसह भाजपचे नगरसेवक ‘या’ शहरात तळ ठोकून! फोटो झाले व्हायरल…

0
kalias sonawane and mukunda sonawane

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । शहर मनपातील फुटाफूट टाळण्यासाठी रात्रीच मुंबई रवाना झालेले भाजपचे नेते माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी नगरसेवकांना नाशिकला बोलावून घेतले आहे. महापौर भाजपाचाच व्हावा यासाठी सर्व सूत्रे नाशिकमधून हलवली जाणार आहेत.

जळगाव मनपातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. एकाच दिवसात अनेक घडामोडी घडून गेल्या असून शिवसेना सत्ता बसविण्याच्या तयारीत तर भाजपा सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होऊन बसलेल्या या घडामोडीत आपले नगरसेवक पळापळ करू नये यासाठी त्यांनी सर्वांना नाशिकला बोलावून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

नुकतेच नगरसेवक कैलास सोनवणे व मुकुंदा सोनवणे हे नाशिकच्या उद्यानात मॉर्निंग वॉक करीत असल्याचा फोटो समोर आला असून त्यांनी देखील जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एकंदरीत तूर्तास जळगाव मनपाचा राजकीय कारभार व्हाया नाशिक चालणार हे निश्चित आहे.

जळगावात भाजपमध्ये मोठी फूट : माजी महापौर ललित कोल्हे शिवसेनेत?

0
lalit kolhe

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । कालपासून भाजप नगरसेवकांचा एक गट ‘नॉट रिचेबल’ झाल्याने जळगावात मोठी खळबळ उडाली असतांना माजी महापौर ललित कोल्हे हातावर शिवबंधन बांधणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

ललित कोल्हे यांनी आपण शिवसेने जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संध्याकाळपर्यंत भाजपमध्ये असणारे ललित कोल्हे अचानक शिवसेनेसोबत गेल्याने माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे.

जळगावच्या राजकारणात विशेषकरून युवकांमध्ये ललीत कोल्हे यांचे मोठे वर्चस्व आहे. शिवसेनेला याचा विशेष फायदा होणार आहे. कोल्हे यांच्यासह त्यांचे समर्थक नगरसेवक देखील शिवसेनेत येणार असल्याने भाजपच्या अडचणींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा: 

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

महापौर निवडणुकीत ट्विस्ट : शिवसेनेने दाखल केला उमेदवारी अर्ज

बिग ब्रेकिंग : जळगावात राजकीय उलथापालथ : माजी मंत्री आ.गिरीष महाजन मुंबई रवाना!

गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !