fbpx

माजी मंत्री आ.महाजनांसह भाजपचे नगरसेवक ‘या’ शहरात तळ ठोकून! फोटो झाले व्हायरल…

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । शहर मनपातील फुटाफूट टाळण्यासाठी रात्रीच मुंबई रवाना झालेले भाजपचे नेते माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी नगरसेवकांना नाशिकला बोलावून घेतले आहे. महापौर भाजपाचाच व्हावा यासाठी सर्व सूत्रे नाशिकमधून हलवली जाणार आहेत.

जळगाव मनपातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. एकाच दिवसात अनेक घडामोडी घडून गेल्या असून शिवसेना सत्ता बसविण्याच्या तयारीत तर भाजपा सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होऊन बसलेल्या या घडामोडीत आपले नगरसेवक पळापळ करू नये यासाठी त्यांनी सर्वांना नाशिकला बोलावून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

नुकतेच नगरसेवक कैलास सोनवणे व मुकुंदा सोनवणे हे नाशिकच्या उद्यानात मॉर्निंग वॉक करीत असल्याचा फोटो समोर आला असून त्यांनी देखील जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एकंदरीत तूर्तास जळगाव मनपाचा राजकीय कारभार व्हाया नाशिक चालणार हे निश्चित आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज