⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024

जळगावातील आशादीप वसतिगृहातील प्रकरणावरून सुधीर मुनंगटीवारांचा संताप; म्हणाले….

0

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ मार्च २०२१ | शहरातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घडलेल्या प्रकरणावरून भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितल.

आमच्या आयाबहिणीला नग्न केलं जातं हे महाराष्ट्राला शोभते काय? आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज विधानसभेत त्यावरून पडसाद उमटले. आमदार श्वेता महाले यांनी जळगावच्या आशादीप वसतिगृहाचा हा विषय काढला. पोलीस महिलांचे रक्षक आहेत. पण तेच महिलांवर अन्याय करत आहेत. महिलांना नग्न करून नाचवले जात आहे हे गंभीर आहे, असं महाले म्हणाल्या. .

कोंबडीचे पैसे मागितले म्हणून एकाला मारहाण

0
beating someone

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२१ । कोंबडीचे पैसे घेण्यासाठी घरी का गेला असा जाब विचारात एका मटण विक्रेत्याला एकाने मारहाण केल्याची घटना शिरसोली रोडवरील जैन कंपनीजवळ घडली.

याबात अधिक माहिती अशी कि, रियाज खाटीक रा. शिरसोली याने लोखंडी पाईपाने मटन विक्रेता बाबु खाटीक रा. मेहरूण बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घडली.

बाबु कासम खाटी (वय-४६) रा. राम नगर, मेहरूण हा मटन विक्रेता आहे. मटनचा व्यवसाय असल्यामुळे तालुक्यातील शिरसोली येथील रियाज इलियाज खाटीक याच्याकडून कोंबडी घेत असतो. दरम्यान, २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता रियाज खाटीक हा कोंबडीचे पैसे घरी गेला होता. पैस मिळाले नाही म्हणून दुपारी बाबु खाटीकच्या दुकानावर रियाज आला असता.

कोंबडीचे पैसे घेण्यासाठी घरी का गेला असा विचारल्याचा राग आल्याने रियाजने लोखंडी पाईप घेवून बाबु खाटीकच्या डोक्यात मारहाण केली. यात बाबु खाटीक गंभीर जखमी झाला. जखमीवस्थेत जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रियाज खाटीक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

सुप्रीम कॉलनीतून चोरट्यांनी चक्क ट्रकच लांबवला

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२१ । सुप्रिम कॉलनीतून अज्ञात चोरट्यांनी ट्रक लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सद्दाम हुसैन बशीर खान (वय-२९) रा. मास्टर कॉलनी हे ट्रक मालकाचे नाव आहे. त्यांच्याकडे टाटा कंपनीचा एमएच १९ जे ३३२३ हा २ लाख ५० हजारांचा ट्रक आहे. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांनी शहरातील सुप्रिम कॉलनी परीसरातील विरराम इंटरप्रायझेस कंपनीसमोरील मोकळ्या जागेवर लावला होता. १ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सद्दाम हुसैन हे ट्रकजवळ गेले ट्रक चोरीस गेल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिंन मुंढे करीत आहे.

धक्कादायक : महिला वसतिगृहात अनैतिक कृत्य?; सामाजिक संस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

0
atrocities on women

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी कि, सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांनी आज २ मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे आशादिप महिला वसतिगृह विरोधात तक्रार केली आहे.

मंगला सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले आशादिप महिला वसतिगृहात गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरूषांना अनधिकृतपणे प्रवेश दिला जात आहे. पोलीस कर्मचारी हे वसतीगृहातील अधिकारी यांच्या संगनमताने बेकायदेशीर आत प्रवेश करून मनमानी कारभार करून वसतीगृहातील महिला व तरूण मुलींसोबत गैरव्यवहार करत आहे.

सोमवारी १ मार्च २०२१ रोजी वस्तीगृहामध्ये काही पोलीस कर्मचारी व अनोळखी पुरूष यांनी प्रवेश करून मुलीसोबत अश्लिल चाळे करून नृत्य करण्यास भाग पाडले. यावर मुलींनी नकार दिल्याने त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात सामाजिक कार्यकत्या मंगला सोनवणे सह इतर कार्यकर्त्या गेल्या असता वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुलींना भेटू दिले नाही.

त्यावेळी वसतीगृहात असलेल्या वरच्या मजल्यात राहत असलेल्या मुलींनी खिडकीतून आरडाओरड करून सांगितले की, आम्हाला सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलू द्या. मात्र वसतिगृहातील पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्त्या यांना बोलू दिले नाही आणि मुलीना बोलू न देण्याबाबत दबाव टाकत असल्याचा धक्कादायक आरोप देखील कारणात आला आहे.

दरम्यान, आशदिप वस्तीगृहात चाललेल्या या गोरखधंद्याची चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक समिती नेमावी अशी मागणी केली आहे.  निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे, फिरोज तडवी, फरीद मुशिर खान, प्रतिभा भालेराव, साहिल पठाण, आबिद नाजी शेख, वर्षा लोहार, फारूख कादरी, वासंती दिघे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सावधान : कुरिअर आल्याचे सांगत भामट्याने घरातून लांबविला मोबाईल

0
mobile theft

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील सलार नगरात कुरिअर आल्याचे सांगत भरदिवसा घरातून एका भामट्याने मोबाईल लांबविला आहे. हि घटना ३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.

याविषयी सविस्तर माहिती अशी कि, बबिता भाईमिया शेख (वय-४५) रा.सलार नगर ह्या घरात एकट्या असतांना मागच्या वाड्यात भांडे धुवत होत्या. यावेळी एक अनोळखी व्यक्ती येवून म्हणाला की, दिदी आपका कुरिअर आया है असे बोलत बोलवत तो घरात आला.

बबिता शेख यांनी आमचे कुठलेही कुरिअर वगैरे नाहीअसे सांगितल्यावर तो निघून गेला. त्यानंतर थोड्यावेळानंतर भांडे धुवून झाल्यानंतर मोबाईल पाहण्यासाठी गेले असता जागेवर मोबाईल दिसून आला नाही. त्याच भामट्याने आपला मोबाईल चोरून नेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलीसात धाव घेतली. बबिता शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीएस व्हायचे आहे असे व्हाॅट्सअ‍ॅपवर सांगत मुलीने सोडले घर

0
फोटो : प्रतीकात्मक

जळगाव लाईव्ह न्यूज । ‘आयपीएस व्हायचे आहे. आता मी काहीतरी मोठी नोकरी करूनच घरी परत येईल, घरचे लोक मला शिकू देत नाही, मला शिकून मोठे व्हायचे आहे’, असा मेसेज करून एक मुलगी हाॅस्टेलमधून निघून गेली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील ही १७ वर्षीय मुलगी शिक्षणासाठी सध्या जळगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील हाॅस्टेलमध्ये राहत होती. सदर हॉस्टेल जयंत माधव राणे यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे. या तरुणीने २८ रोजी आई-वडिलांना व्हाॅट्सअ‍ॅपवरून एक व्हाॅइस मेसेज केला आहे. यात तिने ‘शिकून मोठे होण्याचे’ स्वप्न बोलून दाखवले. तसेच मला शिकू देत नाहीत अशी खंतही व्यक्त केली आहे.

मेसेज मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. हाॅस्टेलवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ही मुलगी कोणासही काही सांगून गेलेली नाही. हा प्रकार २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता समोर आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेश शिंदे तपास करीत आहे.

भरदुपारी बंदुकीचा धाक दाखवून लुटणारे धुळ्यातील

0

जळगाव लाईव्ह न्यूज । भरदुपारी बंदुकीचा धाक दाखवून १५ लाख रूपयांची लुट करणारे दोन्ही भामटे हे धुळ्याचे असल्याचे पोलिसांनी शोधून काढले असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सिंधी कॉलनी रोडवर असणार्‍या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास १५ लाखांची रोकड घेऊन जाणार्‍या दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून रोकड लुटण्याची घटना घडली होती. यावेळी आरोपींसोबत झटापटीत झाल्याने त्यांनी बाईक व काडतुसांचे मॅगेझिन तिथेच सोडून पाल काढला होता. परंतु परिसरातील काही सीसीटिव्हींमध्ये हे चोरटे जेरबंद झाले होते.

हे भामटे धुळ्याचे असूनमनोज मोकळ आणि विक्की राणा असे त्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या दोघांचा माग काढण्यासाठी विशेष पथक कामावर लावले आहे. यात ते धरणगावमार्गे अमळनेरकडे निघून गेल्याचे दिसून आले आहे.

महापौरांचा सत्कार केल्यावरून अनंत जोशी आक्रमक

0
shivsena Anant Joshi honoring the mayor bharati sonawane

जळगाव लाईव्ह न्यूज । विद्यमान महापौरांनी चांगले काम केले हे आपणच नाही तर शिवसेनेचे उपनेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आणि महापालिकेतील विरोधीपक्षनेते सुनील महाजन यांनीही जाहीरपणे सांगितले होते. आम्ही फक्त कृतीतून बोललो, असे सांगत सत्कार करण्याच्या कृतीचे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते अनंत उर्फ बंटी जोशी पुन्हा समर्थनच केले आहे.

बंटी जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार करण्यापूर्वी पक्षातील वरीष्ठ नेत्यांना विचारले नाही ही चूक शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते अनंत उर्फ बंटी जोशी यांनी मान्य केली आहे.

महापालिकेच्या महासभेत शिवसेनेच्या वतीने महापौर यांचा उत्तम कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला होता. विरोधीपक्षाने केलेल्या या सत्काराचा नागरिकांमध्ये सकारत्मक संदेश गेला होता. अनेकांनी या कृतीचे समर्थन केले होते. त्यानंतर संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी महापालिकेतील पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यात सत्कारासाठी पुढाकार घेणाऱ्यांची कान उघाडणी केली होती. 

यामुळे नाराज होत अनंत जोशी यांनी तडकाफडकी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा शिवसेनेचे महानगर प्रमुख यांच्याकडे सोपवला होता. अडीच वर्ष आपण हे पद सांभाळले, आता अन्य सदस्यांना संधी मिळावी यासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. 

ऐकावं ते नवलच… स्विफ्ट कारमधून चोरायचा बकऱ्या

0
goats to steal from a Swift car

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल प्रतिनिधी । यावल चोपडा रोडवर असलेल्या अकसानगर वसाहतीतुन स्विफ्ट कारमध्ये येऊन बकऱ्या चोरणाऱ्या भामट्यास पकडण्यात आले आहे. 

या संदर्भात अधिक माहीती अशी की, यावल शहरातील अक्सानगर परिसरातुन आज सोमवार दि. १ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एमपी ०९ जीके ९४५३या स्विफ्ट कारमधून ईम्रान रफीक पठाण (वय ४८ वर्ष राह. ईन्दौर मध्य प्रदेश) हा चार बकऱ्या गाडीच्या डिकीत भरून चोरून घेवुन जात होता. या बकऱ्यांची अंदाजित किंमत ४५ हजार रुपये आहे. अक्सानगर परिसरातुन अजुन काही बकऱ्या चोरीच्या प्रयत्नात असतांना सर्तक व जागृत नागरिकांना तो आढळुन आलेल्याने परिसरातील नागरीकांनी त्यास रंगेहाथ पकडुन त्यास चांगला चोप दिला.

वृत्त कळताच तात्काळ दखल घेत पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, कर्मचारी असलम रवान, भुषण चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली व बकऱ्या चोरी करणाऱ्या ईम्रान रफीक पठाण यास वाहनासह ताब्यात घेतले आहे. घटना स्थळावरून दोन जणं फरार होण्यात यशस्वी झाले. सदरच्या या बकऱ्या फैजपुर परिसरातुन चोरून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.