⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | राजकारण | महापौरांचा सत्कार केल्यावरून अनंत जोशी आक्रमक

महापौरांचा सत्कार केल्यावरून अनंत जोशी आक्रमक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विद्यमान महापौरांनी चांगले काम केले हे आपणच नाही तर शिवसेनेचे उपनेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आणि महापालिकेतील विरोधीपक्षनेते सुनील महाजन यांनीही जाहीरपणे सांगितले होते. आम्ही फक्त कृतीतून बोललो, असे सांगत सत्कार करण्याच्या कृतीचे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते अनंत उर्फ बंटी जोशी पुन्हा समर्थनच केले आहे.

बंटी जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार करण्यापूर्वी पक्षातील वरीष्ठ नेत्यांना विचारले नाही ही चूक शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते अनंत उर्फ बंटी जोशी यांनी मान्य केली आहे.

महापालिकेच्या महासभेत शिवसेनेच्या वतीने महापौर यांचा उत्तम कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला होता. विरोधीपक्षाने केलेल्या या सत्काराचा नागरिकांमध्ये सकारत्मक संदेश गेला होता. अनेकांनी या कृतीचे समर्थन केले होते. त्यानंतर संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी महापालिकेतील पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यात सत्कारासाठी पुढाकार घेणाऱ्यांची कान उघाडणी केली होती. 

यामुळे नाराज होत अनंत जोशी यांनी तडकाफडकी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा शिवसेनेचे महानगर प्रमुख यांच्याकडे सोपवला होता. अडीच वर्ष आपण हे पद सांभाळले, आता अन्य सदस्यांना संधी मिळावी यासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. 

author avatar
Tushar Bhambare