⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

आ.राजुमामा भोळेंमुळे फुटणार भाजप?

0
suresh damu bhole bjp

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । शहराचे आमदार तथा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या कारभाराला कंटाळून भाजपचे काही नगरसेवक नाराज आहेत. भाजपचे नेते आ.गिरीष महाजन यांच्यासह स्थानिक नेत्यांना वारंवार सांगून देखील त्यांनी दखल न घेतल्याने काही नगरसेवक नॉट रीचेबल झाले आहेत.

जळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्याविरुद्ध नेहमी २ गट मनपात सक्रिय होते. आ.भोळे विरुद्ध अनेकवेळा त्या गटातील नगरसेवकांनी उघडपणे नाराजी देखील बोलून दाखवली होती. आ.भोळे यांच्याकडून मिळणारी वागणूक आणि केला जाणारा भेदभाव योग्य नसल्याने काही नगरसेवक नाराज होते. नाराज नगरसेवकांनी याबाबत वारंवार नेते आ.गिरीष महाजन, आ.चंदूभाई पटेल, श्रीराम खटोड यांच्याकडे नाराजी बोलून देखील दाखवली होती. सध्या महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने मनपात सत्तांतर करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या असून हीच संधी साधत भाजपचे अनेक नगरसेवक नॉटरीचेबल झाले आहेत.

जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत भारत सपकाळे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आ.राजुमामा भोळे यांच्याविरुद्ध उघडपणे नाराजी जाहीर केली. सध्या तरी शिवसेनेत कुणीही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे मात्र काही नगरसेवक नॉटरीचेबल असल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहे.

हे देखील वाचा :

माजी मंत्री आ.महाजनांसह भाजपचे नगरसेवक ‘या’ शहरात तळ ठोकून! फोटो झाले व्हायरल…

जळगावात भाजपमध्ये मोठी फूट : माजी महापौर ललित कोल्हे शिवसेनेत?

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

माजी मंत्री आ.महाजनांसह भाजपचे नगरसेवक ‘या’ शहरात तळ ठोकून! फोटो झाले व्हायरल…

0
kalias sonawane and mukunda sonawane

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । शहर मनपातील फुटाफूट टाळण्यासाठी रात्रीच मुंबई रवाना झालेले भाजपचे नेते माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी नगरसेवकांना नाशिकला बोलावून घेतले आहे. महापौर भाजपाचाच व्हावा यासाठी सर्व सूत्रे नाशिकमधून हलवली जाणार आहेत.

जळगाव मनपातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. एकाच दिवसात अनेक घडामोडी घडून गेल्या असून शिवसेना सत्ता बसविण्याच्या तयारीत तर भाजपा सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होऊन बसलेल्या या घडामोडीत आपले नगरसेवक पळापळ करू नये यासाठी त्यांनी सर्वांना नाशिकला बोलावून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

नुकतेच नगरसेवक कैलास सोनवणे व मुकुंदा सोनवणे हे नाशिकच्या उद्यानात मॉर्निंग वॉक करीत असल्याचा फोटो समोर आला असून त्यांनी देखील जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एकंदरीत तूर्तास जळगाव मनपाचा राजकीय कारभार व्हाया नाशिक चालणार हे निश्चित आहे.

जळगावात भाजपमध्ये मोठी फूट : माजी महापौर ललित कोल्हे शिवसेनेत?

0
lalit kolhe

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । कालपासून भाजप नगरसेवकांचा एक गट ‘नॉट रिचेबल’ झाल्याने जळगावात मोठी खळबळ उडाली असतांना माजी महापौर ललित कोल्हे हातावर शिवबंधन बांधणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

ललित कोल्हे यांनी आपण शिवसेने जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संध्याकाळपर्यंत भाजपमध्ये असणारे ललित कोल्हे अचानक शिवसेनेसोबत गेल्याने माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे.

जळगावच्या राजकारणात विशेषकरून युवकांमध्ये ललीत कोल्हे यांचे मोठे वर्चस्व आहे. शिवसेनेला याचा विशेष फायदा होणार आहे. कोल्हे यांच्यासह त्यांचे समर्थक नगरसेवक देखील शिवसेनेत येणार असल्याने भाजपच्या अडचणींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा: 

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

महापौर निवडणुकीत ट्विस्ट : शिवसेनेने दाखल केला उमेदवारी अर्ज

बिग ब्रेकिंग : जळगावात राजकीय उलथापालथ : माजी मंत्री आ.गिरीष महाजन मुंबई रवाना!

गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !

बिग ब्रेकिंग : जळगावात राजकीय उलथापालथ : माजी मंत्री आ.गिरीष महाजन मुंबई रवाना!

0
girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । शहर मनपातील राजकारण चांगलेच तापले असून नगरसेवक फुटीच्या भीतीने सत्ताधारी भाजप गोटात चांगलीच तारांबळ उडाली आहे. जळगावात सांगली पॅटर्न यशस्वी होऊ न देण्यासाठी जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आ.गिरीष महाजन तात्काळ मुंबई रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जळगाव मनपावर सेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी शिवसेनेसह आघाडीकडून नवीन डाव खेळला जात आहे. भाजपचे २५ पेक्षा जास्त नगरसेवक तळाला लागले असल्याचे सेना नेत्यांनी स्पष्ट केले असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. काल सायंकाळी माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या कार्यालयावर असलेले भाजप नगरसेवक आज चक्क नॉट रीचेबल असल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. जळगावात मंत्री जयंत पाटलांचा सांगली पॅटर्न यशस्वी होतो की काय? या भीतीने सायंकाळपासून भाजपच्या अनेक छुप्या बैठका सुरू होत्या. रात्री माजी मंत्री आ.गिरीष महाजन तात्काळ विमानाने मुंबई रवाना झाले आहे. तत्पूर्वी त्यांनी विमानतळावर बराच वेळ स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप-सेनेच्या या डावात कोण यशस्वी होतो हे येत्या २ दिवसात स्पष्ट होणारच आहे मात्र जळगावकर कोणत्या परिस्थितीतून जात आहे याची एकही राजकारण्याला चिंता नाही हे मात्र निश्चित आहे.

हे देखील वाचा :

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

महापौर निवडणुकीत ट्विस्ट : शिवसेनेने दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव मनपातील सत्तांतरच्या चर्चा ‘फुसका फटका’

गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !

एरंडोल येथे दोघांचा मृत्यू

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । एरंडोल येथील गांधीपुरा भागातील महादेव मंदिराजवळ राहणारे सुरेश सखाराम कुदाळे (वय ४३) यांचा चुनाभट्टी परिसरातील अंजनी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.तर उत्राण गु.ह. येथील रहिवाशी रमेश रामचंद्र लोहार (वय ६५) यांचे प्रेत जहांगीर पुरा भागातील महादेव मंदिराच्या मागे आढळून आले. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विशेष हे की दोघं अती मद्य प्राशन करणारे होते.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन वरुन मिळालेल्या माहिती नुसार दि.१४ मार्च रोजी सकाळी आठ वाजे पूर्वी एरंडोल शहरातील अंजनी नदीच्या जवळ असलेल्या चुनाभट्टी जवळ नदीच्या पाण्यात सुरेश कुदाळे यांचे प्रेत आढळून आले.दरम्यान सुरेश चे प्रेत हे अती मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले आहे.यावरून एरंडोल पोलीस स्टेशनला सुरेश यास अत्यंत दारु पिण्याची सवय असल्याने त्याने दारूच्या नशेत आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान उद्या दि.१५ मार्च रोजी सुरेश च्या मुलीचे लग्न होते.आज हळद होती.त्यातच सुरेश च्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

किशोर सखाराम कुदाळे यांच्या फिर्यादवरून एरंडोल पोलीस स्टेशनला अ.मु. रजि.नं. 11/2021 सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे तसेच एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील रहिवाशी रमेश रामचंद्र लोहार (वय६५) हे उत्राण येथील त्यांचा मुलगा सागर रमेश लोहार यांच्या कडे राहतात.ते थोडे वेडसर असुन त्यांना अत्यंत दारु पिण्याची सवय होती व ते नेहमी कोणालाही काही एक न सांगता घरातुन निघुन जात असल्याचे सागर याने फिर्यादीत सांगितले आहे.त्यांचे प्रेत आज दि.१४ मार्च रोजी एरंडोल येथील जहांगीर पुरा भागातील महादेव मंदिराच्या मागे आढळून आले.दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनला त्यांचा मुलगा सागर रमेश लोहार यांच्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल पाटील,संदिप सातपुते करीत आहेत.

यावेळी गांधीपुरा भागातील रहिवाशांनी एरंडोल शहरात ये जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या अरुंद पुलाचे रुंदीकरण व्हावे अशी मागणी केली आहे कारण नेहमी या पुलांवरून ये जा करणाऱ्यांना पुलावरून चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.अनेक वेळेस लहान बालक,वयोवृद्ध या पूलांवरून खाली पडली आहे.परंतु आजच्या घटनेने मात्र पुऱ्यातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

महत्वाची बातमी : सावदा शहर बंदच्या अफवावर विश्वास ठेवू नका

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । सावदा पुढील ५ दिवस बंद असल्याबाबत सध्या अफवा पसवण्यात येत आहे. मात्र सावदा शहर बंद होण्याबाबत किंवा ठेवण्याबाबत मा जिल्हाधिकारी जळगाव तथा प्रमुख जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून आदेश प्राप्त नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा वर विश्वास ठेऊ नये असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.

तसेच ज्या दुकानदार,फळ विक्रेते,भाजी विक्रेते,व इतर किरकोळ विक्रेते ,हॉस्पिटल्स, मेडिकल यांना त्यांच्या सर्व स्टाफ सह टेस्टिंग ग्रामीण रुग्णालय सावदा येथे टेस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई नगरपरिषद तर्फे सुरू करण्यात आलेली आहे,तरी संबंधितांनी 2 दिवसात टेस्टिंग कराव्यात असे मुख्याधिकारी सावदा नगरपरिषद सौरभ जोशी यांनी कळवले आहे

जळगाव मनपातील सत्तांतरच्या चर्चा ‘फुसका फटका’

0
jalgaon-manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । शहर मनपात महापौर, उपमहापौर निवडीवरून सध्या चर्चा रंगत असून रविवारी नवीनच चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे काही नगरसेवक भुर्रर्र झाले असून मनपात सत्तांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सत्तांतरच्या बातम्या निव्वळ फुसका फटका असून सोलापूर पॅटर्न शिवसेनेला जळगावात शक्य नसल्याचे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलतांना स्पष्ट केले.

जळगाव मनपात भाजपचे एकहाती बळ असून शिवसेनेचे सदस्य कमी आहेत. भाजपचा महापौर आणि उपमहापौर बिनविरोध होऊ नये यासाठी शिवसेनेकडून मुद्दाम वातावरण निर्मिती केली जात आहे. महापौर पदासाठी इच्छुकांना माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी शब्द दिलेला आहे. इच्छुकांना कमी-अधिक कालावधीसाठी महापौर पद देण्यात येणार असल्याचे त्यांना अगोदरच कळविण्यात आले आहे, त्यामुळे कुणीही कुठेही जाण्याची शक्यता नाही. पक्षात काही नाराज असू शकतात परंतु सत्तांतर होणे शक्य नाही.

महापौर निवड १८ रोजी होणार असून महापौर भाजपाचाच होणार असल्याचे दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वेळी महापौर निवडीप्रसंगी आणि स्थायी समिती निवडीला देखील शिवसेनेने आमचाचा सदस्य विराजमान होणार अशा चर्चा पसरवल्या होत्या परंतु भाजपच्याच हाती पद कायम राहिले, असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा :

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

जळगाव मनपातील सत्तांतरच्या चर्चा ‘फुसका फटका’

गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !

महापौर निवडणुकीत ट्विस्ट : शिवसेनेने दाखल केला उमेदवारी अर्ज

0
jayashri mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । भाजपचे काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ होताच शिवसेनेने महापौर पदासाठी अर्ज दाखल करून निवडणुकीत धमाल आणली आहे. शिवसेनेतर्फे जयश्री सुनील महाजन यांनी अर्ज दाखल केला असून पक्षातर्फे व्हीप देखील जाहीर करण्यात आला आहे.

महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक १८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. सुरवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत आता रंगत आली असून यामागे एकनाथ खडसे असल्याची चर्चा जळगावात सुरु झाली आहे. आता या निवडणुकीचा काय निकाल येतो यावर बरेच काही आवलंबून आहे. एकप्रकारे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह आ. राजूमामा भोळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हे देखील वाचा : नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

जयश्री महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना माजी महापौर नितीन लढ्ढा, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे, महानगराध्यक्ष शरद तायडे, इब्राहिम पटेल, प्रशांत नाईक, नितीन सपके, चेतन शिरसाळे आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

0
eknath khadse girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । महापालिकेतील महापौर निवडीचा गोंधळ वाढत असतांना अचानक भाजपमधील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने खळबळ उडाली आहे. काही जाणकारांच्या मते ‘नॉट रिचेबल’ नगरसेवक एकनाथराव खडसेंच्या गोटात सामील होण्याची शक्यता आहे.

महापौर भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपमधील इच्छुकांनी लॉबीक सुरू केली आहे. त्यानुसार नवीन भाजपात महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपाचा महापौर बनणार असल्याचे निश्‍चित मानले जात होते. परंतु आज अचानक नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याचे कळताच भाजप नेत्यांची मोठी धावपळ सुरु झाली आहे.

महापौर व उपमहापौरपदाची निवड १८ मार्च रोजी होणार आहे. महापालिकेत आजवर माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचा शब्द आजवर अंतीम मानला जात होता. परंतु गेल्या काही दिवसात पक्षातील गटबाजी उघडपणे समोर येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महापालिकेत सत्तांतर होऊ शकते असे संकेत दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याच्या फार्म हाऊसवर बैठक झाल्यानंतर अचानक काही नगरसेवक हे ‘नॉट रिचेबल’ झाले आहे. यामागे एकनाथ खडसे असल्याचे काही नेत्यांनी खाजगीत बोलतांना सांगितले.

हे देखील वाचा :

महापौर निवडणुकीत ट्विस्ट : शिवसेनेने दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव मनपातील सत्तांतरच्या चर्चा ‘फुसका फटका’

गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !