fbpx

जळगाव मनपातील सत्तांतरच्या चर्चा ‘फुसका फटका’

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचे स्पष्टीकरण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । शहर मनपात महापौर, उपमहापौर निवडीवरून सध्या चर्चा रंगत असून रविवारी नवीनच चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे काही नगरसेवक भुर्रर्र झाले असून मनपात सत्तांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सत्तांतरच्या बातम्या निव्वळ फुसका फटका असून सोलापूर पॅटर्न शिवसेनेला जळगावात शक्य नसल्याचे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलतांना स्पष्ट केले.

जळगाव मनपात भाजपचे एकहाती बळ असून शिवसेनेचे सदस्य कमी आहेत. भाजपचा महापौर आणि उपमहापौर बिनविरोध होऊ नये यासाठी शिवसेनेकडून मुद्दाम वातावरण निर्मिती केली जात आहे. महापौर पदासाठी इच्छुकांना माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी शब्द दिलेला आहे. इच्छुकांना कमी-अधिक कालावधीसाठी महापौर पद देण्यात येणार असल्याचे त्यांना अगोदरच कळविण्यात आले आहे, त्यामुळे कुणीही कुठेही जाण्याची शक्यता नाही. पक्षात काही नाराज असू शकतात परंतु सत्तांतर होणे शक्य नाही.

महापौर निवड १८ रोजी होणार असून महापौर भाजपाचाच होणार असल्याचे दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वेळी महापौर निवडीप्रसंगी आणि स्थायी समिती निवडीला देखील शिवसेनेने आमचाचा सदस्य विराजमान होणार अशा चर्चा पसरवल्या होत्या परंतु भाजपच्याच हाती पद कायम राहिले, असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा :

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

जळगाव मनपातील सत्तांतरच्या चर्चा ‘फुसका फटका’

गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज