⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024

जळगाव महापालिकेवर भगवा फडकणार हे निश्चित; गिरीश महाजनांना जोरदार धक्का

0
shivsena manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । महाराष्ट्रभर गाजत असलेल्या जळगाव महापालिका महापौर आणि उमपहापौरपदांच्या निवडणुकीत शिवसेना सतरा मजलीवर पुन्हा एकदा भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेला४५ तर भाजपला३० मते मिळाली आहेत.

याविषयी सविस्तर वृत्त की, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखालील सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची ऑनलाईन निवडणूक सुरु आहे. सुरवातीला  अ‍ॅड. शुुचीता हाडा यांनी यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी ही आक्षेप फेटाळून लावले.

यामुळे निवड प्रक्रिया सुरू असतांना स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी ही ऑनलाईन सभा बेकायदेशीर असून भाजप याच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली. ही निवड निवडणूक अधिनियम २००५ च्या प्रमाणे होत नसल्याने आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत शिवसेनेचे सौ. जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्‍चित झालेला आहे. त्यांनी बहुमताचा ३८ आकडा पार केल्याने आता त्यांची निवड निश्चित समजली जात आहे.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/195277769065579/

 

अमळनेर पालिका हद्दीत 19 ते 21 मार्चपर्यंत जनता कर्फ्यु ; काय सुरु काय बंद राहणार?

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । अमळनेर शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपालिकेच्या हद्दीत दि. १९ ते २१ मार्चपर्यंत जनता कॅर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

अमळनेर नगर परिषद हद्दीत दिनांक २० मार्च ते २२ मार्च २०२१ या कालावधी मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविता याव्यात यांकरिता उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विशेष अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी अमळनेर नगरपरिषद हद्दीमध्ये फक्त शहरी भागांमध्ये दिनांक २० मार्च ते  २१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये लॉक डाउन राबविण्यास मंजुरी दिलेली आहे.तसेच २२ मार्च सोमवारी जनता कर्फ्यु मुळे शहर बंद राहील.अमळनेर नगरपालिका हद्दीतील सर्व  व्यवसायिक,परिसरातील शेतकरी बांधव यांनी याची नोंद घ्यावी.

हा दूध खरेदी विक्री केंद्र, खाजगी व शासकीय वैद्यकीय स्थापना, औषध केंद्रे, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित अधिकारी-कर्मचारी तसेच दिनांक 21 मार्च 2021 या दिवशी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व  परीक्षेसाठी जाणारे परीक्षार्थी तसेच या परीक्षेसाठी सेवा वर्ग अधिकारी कर्मचारी यांना लागू असणार नाही.

तर सर्व आठवडे बाजार बाजारपेठा, किराणा दुकान इतर सर्व दुकाने, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र,शैक्षणिक संस्था शाळा,महाविद्यालय, खाजगी कार्यलय बंद राहतील तसेच हॉटेल रेस्टॉरंट (होम डिलिव्हरी व पार्सल वगळता) सर्व बंद राहील त्याच बरोबर शॉपिंग मॉल्स मार्केट सलून, दारूची दुकाने गार्डन,पार्क, बगीचे सिनेमागृहे नाट्यगृहे व्यायाम शाळा जलतरण तलाव, क्रीडा स्पर्धा प्रदर्शने मेळावे,पान टपरी हातगाड्या उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रीचे दुकाने बंद राहतील.

शासकीय रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलेचा पाय घसरून मृत्यू

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाळधी येथील ३८ वर्षीय महिलेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.  दरम्यान, महिलेला योग्य उपचार मिळाले नसून, जीएमसीच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिला दम लागत होता. त्यामुळे ही महिला दोन दिवसांपूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली होती. या महिलेला सी टू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान ही महिला पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे; परंतु संबंधित महिलेवर योग्य उपचार झाले नसल्यामुळे जमिनीवर पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अारोप कुटंुबीयांनी केला आहे.

यात प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचाही आरोप नातेवाइकांनी केला. दरम्यान, रात्री प्रशासनाने समजावल्यानंतर तिचा मृतदेह शवागारमध्ये ठेवला आहे.

अधिकृत निवडी आधीच शहरात शिवसैनिकांची बॅनरबाजी सुरु

0
viraj kawdiya

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ ।  शहर मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सभागृहात सुरू असून निवड होण्यापूर्वीच शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचे फलक लावले आहे.

मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शिवसेना कार्यकर्ते विराज कावडिया यांनी जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांच्या निवडीचे फलक लावले आहे. भगवा फडकला अशा शब्दात असलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सरिता माळी यांच्यासह इतरांच्या नावाला भाजपची हरकत

0
jalgaon-manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । मनपा महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू असून अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. माघारीची वेळ असताना भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. मनपातील स्वीकृत नगरसेवकांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार नाही. ऑनलाईन पद्धतीत ८७ सदस्य दिसून येत आहे त्यात सरिता माळी नामक महिला दिसून येत आहे. नेमका हा काय प्रकार आहे? अशी हरकत भाजप नगरसेवकांनी नोंदविली असून निवडणूक प्रक्रिया थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भाजप पिठासन अधिकाऱ्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार

0
bjp jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडप्रसंगी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या अर्जाला भाजपकडून हरकत घेण्यात आली. पिठासन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला आहे. दरम्यान, पिठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा भाजप नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी दिला आहे. निवडीवरून सभागृहात जोरदार खडाजंगी सुरू आहे.

शिवसेनेच्या जयश्री महाजनांच्या अर्जाला भाजपकडून हरकत

0
jalgaon-manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शहर मनपाच्या महापौर आणि उपमहापौर निवडीला प्रारंभ झाला असून उमेदवारांचे अर्ज वाचून दाखवले जात आहे. शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा अर्ज वाचून दाखविल्यानंतर सूचक आणि अनुमोदक असलेले नितीन लढ्ढा आणि प्रशांत नाईक यांचे नाव गॅझेटनुसार नसल्याचे सांगत भाजपच्या नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी त्यावर हरकत घेतली आहे.

तसेच उमेदवार, सूचक, अनुमोदक यांच्या सह्या देखील तपासण्यात याव्या असेही त्यांनी सांगितले. याबाबतचे लेखी म्हणणे त्यांनी मांडले आहे. पिठासन अधिकाऱ्यांना हरकत नोंद करण्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज्यात आजपासून चार दिवस पाऊस ; मध्य महाराष्ट्रासह ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

0
rain in maharashtra

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । राज्यात आजपासून चार दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. १८ ते २१ मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. त्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. 

राज्यात 18-21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर भारतीय हवामान खात्याने (IMD) काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे. हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

तसेच औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर ,भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झालीय. आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यात आता अवकाळी पावसाने शेतीवर होणारा विपरित परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर अवकाळी पावसाचा वाईट परिणा होतो आणि हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीतकमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न सुरु केलेत.

ब्रेकिंग न्यूज : खुबचंद साहित्यांच्या भावाकडे दरोड्याचा प्रयत्न

0
khubchand sahitya

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । शहरातील इच्छादेवी चौकात असलेल्या स्वामी टॉवरमध्ये राहत असलेले बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांच्या भावाकडे सायंकाळी दरोड्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी तलवार आणि बंदुकीचा धाक दाखविल्याची माहिती समोर येत आहे.

जळगावातील बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांचे भाऊ सतिष प्रेमचंद साहित्या हे इच्छादेवी चौकातील स्वामी टॉवरमध्ये राहतात. सायंकाळी ७.२० वाजता मास्क आणि रुमाल घातलेले चार तरुण त्यांच्या घरात घुसले. घरातील मुलांना धाक दाखवीत दरोड्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी मोबाईल हिसकावत काढता पाया घेतला मात्र बाहेर जाताना तो मोबाईल देखील फेकून दिल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा ताफा हजर झाला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतल्याचे कळते.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/2961079964124160/