⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

जळगाव महापालिकेवर भगवा फडकणार हे निश्चित; गिरीश महाजनांना जोरदार धक्का

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । महाराष्ट्रभर गाजत असलेल्या जळगाव महापालिका महापौर आणि उमपहापौरपदांच्या निवडणुकीत शिवसेना सतरा मजलीवर पुन्हा एकदा भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेला४५ तर भाजपला३० मते मिळाली आहेत.

याविषयी सविस्तर वृत्त की, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखालील सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची ऑनलाईन निवडणूक सुरु आहे. सुरवातीला  अ‍ॅड. शुुचीता हाडा यांनी यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी ही आक्षेप फेटाळून लावले.

यामुळे निवड प्रक्रिया सुरू असतांना स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी ही ऑनलाईन सभा बेकायदेशीर असून भाजप याच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली. ही निवड निवडणूक अधिनियम २००५ च्या प्रमाणे होत नसल्याने आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत शिवसेनेचे सौ. जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्‍चित झालेला आहे. त्यांनी बहुमताचा ३८ आकडा पार केल्याने आता त्यांची निवड निश्चित समजली जात आहे.