⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024

गिरीश महाजन यांनी जळगाव शहराची वाट लावली; गुलाबराव पाटलांची टीका

0
gulabrao patil girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२१ । गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांजवळ बसत होते तरीही ते जळगाव जिल्ह्यासाठी निधी आणू शकले नाही. गिरीश महाजन यांनी जळगाव शहराची वाट लावली, अशी टीका पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

संकटमोचक म्हणून मिरवून घेण्यात गिरीश महाजन व्यस्त होते. आपला जिल्हा सोडून ते बाहेरच फिरत राहिले. हा आपल्या पक्षाचा, हा दुसऱ्या पक्षाचा असाच भेदभाव करण्यात त्यांनी वेळ घालवल्याचा आरोप देखील गुलाबराव पाटील यांनी केला.

जिल्हा नियोजन समितीतून जळगाव महापालिकेला विविध विकासकामांसाठी ६१ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे देखील गुलाबराव पाटलांनी यावेळी सांगितले. गेल्या काळात पालकमंत्री असतांना भाजपचे चंद्रकांत पाटील तसेच गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती निधी दिला याची आकडेवारी दाखवावी, असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले.

कोळवद आरोग्य विभाअंतर्गत, आरोग्य वर्धिनी केंद्रात कोवीड १९च्या लसीकरणास प्रारंभ

0
yawal-kolwad-covid-vaccination

जळगाव लाईव्ह न्यूज | २ मे २०२१ | यावल   ग्रामीण भागात पातळीवर सुरू कोरोनाचा संसर्गा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लक्षात घेता आरोग्य उत्तम यंत्रणाही अधिक सर्तक व सज्ज झाली असून या दृष्टीकोणातुन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडसीम अंतर्गत येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्र कोळवद येथे उपकेंद्र स्थरावर कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणास आज प्रारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, सरपंच याकुब तडवी, उपसरपंच शशिकांत चौधरी, सामजिक कार्यकर्ते अतुल भालेराव, वैद्यकीय अधिकारी डाँ नसीमा तडवी कोतवाल, ग्रापंचात सदस्य अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, फत्तु तडवी आदि उपस्थित होते.

प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनीषा कोईराला महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ नसीमा तडवी, डॉ गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी ४५वर्षावरील ३० नागरिकांना कोवीड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. कोळवद व सातोद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ साजिद तडवी, डॉ राहूल गजरे, आरोग्यसेविका मेहमूद तडवी, आरोग्यसेवक भूषण पाटील, आशा सेविका छाया वाघुळदे, उषा कोळी, सरला गुंजाळ व सायरा तडवी यांनी यशस्वीपणे नियोजन केले.

ऑक्सिजनअभावी पाचोऱ्यात दोघांचा मृत्यू

0
four patients succumbed to lack of oxygen

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२०१ । पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ३० रुग्ण उपचार घेत असताना ऑक्सिजन संपल्याने प्रचंड खळबळ उडाली. त्यात महेश राठोड (वय २२, रा. कुऱ्हाड बुद्रुक, ता. पाचोरा) व ग्यारसीबाई चव्हाण (वय ७६, रा. हनुमंतखेडा, ता. सोयगाव) या दोघांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.

ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याने उपचारार्थ दाखल असलेल्या रूग्णांचे जीव धोक्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना कळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या दोघांची स्थिती प्रथमपासूनच बिकट होती. त्यात ऑक्सिजनचा प्रश्र बिकट झाला. ऑक्सिजन सिलिंडर दररोज मागवले जातात. गाडी उशिरा आल्याने असा प्रसंग ओढवला. आता ऑक्सिजनचे १८ सिलिंडर प्राप्त झाले असून, दररोज दोन वेळा जळगाव येथे गाडी पाठवून सिलिंडर मागवले जातात. सर्व रुग्णांची परिस्थिती आता ठीक असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी सांगितले.

भा.ज.पा जिल्हा कामगार आघाडी व मंडळ ६ तर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त : रॅपिड अँटिजेन टेस्ट व मास्क वाटप

0
BJP Jalgaon Antigen Camp

जळगाव लाईव्ह न्यूज | २ मे २०२१ | १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त भा ज पा जळगाव जिल्हा कामगार आघाडी व रामानंद मंडल क्रमांक ६ च्या वतीने कोरोना रॅपिट अँटिजेन टेस्ट व मास्क वाटप करण्यात आले.

सकाळी १० ते दुपारी १ वाजे पर्यंत गिरणा टाकी परिसर, रामानंद नगर येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. रामानंद नगर परीसरातील २०० नागरिकांनी व भाजी विक्रेते स्वतः ची चाचणी करुन घेतली त्यात परीसरातील १० नागरीकांची Covid चाचणी पॉझिटिव्ह आली असुन त्यांना तत्काळ कोविन्ड सेन्टर ला भरती करण्यात आले तर या प्रसंगी 300 नागरीकांना मास्क वाटत करण्यात आले. या शिबिराला परिसरातल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिराचे उदघाटन भारत मातेच्या प्रतिभेचे पुजन व मालयारपर्ण भा ज पा जिल्हा अध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजु मामा ) महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर या दरम्यान जेनेरीकार्ट मेडिसीन स्टोअर ऑनलाईन अॅप्स चे देखिल उद्घाटन करण्यात आले. शिबिराचे आयोजन कामगार आघाडी अध्यक्ष कुमार श्रीरामे व मंडळ अध्यक्ष अजित राणे यांनी केले होते.

या प्रसंगी मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील ( घुगे ) महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी ,महेश जोशी,नितीन इंगळे, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला ताई बेंडाळे , महानगर चिटणीस राहुल वाघ, वंदनाताई पाटील, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, मंडळ सरचिटणीस अक्षय चौधरी, नगरसेविका गायत्री ताई राणे , मंडळ चिटणीस भरत बेंडाळे युवा मोर्चा चे उपाध्यक्ष राहुल मिस्त्री ,पियुष महाजन, कोमल तळेले , अरूण चौधरी , जिजाबराव बडगुजर ,शितल साळी,गौरव उमप, डॉ केशवजीत भालेराव,राजु सदावर्ते यांच्या सह मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिराला मनपा प्रभाग समितीचे उदय पाटील व मनपाचे अँटिजेन चाचणी करणारे डॉ पवन ढाकले सर , डॉ निनल भदाणे , सिस्टर कामिनी ईसाळगे , योगिता ठाकुर लॅब टेक्निशियन ए. आर. खान सर , दिलीप पोळ यांच्या पथकाचे सहकार्य लाभले .

‘ई-पास’साठी दररोज येतात पाचशेवर प्रकरणे, सुट्टीच्या दिवशी काम करताय कर्मचारी!

0
police in action

जळगाव लाईव्ह न्यूज | २ मे २०२१ | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हा बंदीचे आदेश जारी केले आहेत. जिल्हा अंतर्गत किंवा जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असून दररोज तब्बल ५०० पेक्षा अधिक नागरिक ई-पाससाठी अर्ज दाखल करीत आहे. सुट्टीचा दिवस असतानाही पोलीस अधिकारी व कर्मचारी काम करीत असून दररोज १५० पेक्षा अधिक पास मंजूर केल्या जात आहेत.

कोरोनामुळे बाहेरगावी जाण्यासाठी शासनाने ई पास बंधनकारक केला असून ठराविक कारणासाठीच पास दिला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पासपोर्ट शाखेत ई-पास तपासणी आणि मंजुरीचे काम सुरू आहे. दररोज सरासरी ५०० प्रकरणे येतात आणि त्यातील नियमात बसणारी १५० प्रकरणे मंजूर केली जातात. पासपोर्ट शाखेत सहाय्यक निरीक्षक दिलीप पाटील, आखेगावकर, सहाय्यक उपनिरीक्षक नरेंद्र पवार, कर्मचारी उदय कापडने, महिला कर्मचारी ज्योती पाटील हे दिवसभर सेवा बजावतात. रविवारी सुट्टी असताना देखील ई-पासच्या तपासणीचे काम सुरू होते.

११ दिवसात ७८५ पास मंजूर तर ३७२२ नाकारल्या

ई-पासची सेवा सुरू होऊन ११ दिवस झाले. ११ दिवसात ७८५ प्रकरणे मंजूर करण्यात आले असून ३७२२ प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहे. सध्या १५०८ प्रकरणे प्रलंबित असून नवीन अर्जाचा ओघ सुरूच आहे.

फक्त ‘या’ कारणासाठी मिळतोय ई-पास

शासनाच्या निर्देशानुसार बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक करण्यात आलेला आहे. अंत्यविधी, लग्न सोहळा आणि वैद्यकीय कारणांसाठीच परवानगी दिली जात आहे. पाससाठी लग्नपत्रिका, मृत्यू दाखला, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, कोविड तपासणी रिपोर्ट जोडणे आवश्यक आहे. नागरिक योग्य कागदपत्रे अपलोड करीत नसून त्यामुळे त्यांना परवानगी नाकारली जात आहे.

जळगाव शहरातील उद्योजक पिता-पुत्रीने केले प्लाज्मा दान

0
Plasma donate Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२१ । माहेश्वरी सभा, महेश प्रगती मंडळ व रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाज्मा दान करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात एक उद्योजक व त्यांच्या मुलीने प्लाज्मा दान केला. या पिता-पुत्रीने प्लाज्मा दान करण्याबाबत समाजामध्ये एक सकारात्मक संदेश दिला आहे.

माहेश्वरी सभेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. अनेक कोरोना रुग्णांना प्लाज्मा दानातून जीवदान मिळतेय. दमयंती इंडस्ट्रीजचे संचालक पवन अशोक मंडोरा व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी शगुन अशोक मंडोरा, तसेच त्यांच्यासह महेश प्रगती मंडळाचे सचिव आनंद पलोड यांनी रेडक्रॉस सोसोयटीत प्लाज्मा दान केले. यानिमित्त त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

मुलीच्या निर्णयाचा अभिमान

प्लाज्मा दान करणारे काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण होते. कोरोनावर मात केल्यानंतर शगुन मंडोरा हिने प्लाज्मा दानाबाबत माहिती घेतली. तिने प्लाज्मा दान करण्याची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. मुलीचा दातु्त्वभाव लक्षात घेता तिचे वडील पवन मंडोरा यांनीही माहेश्वरी सभेच्या माध्यमातून प्लाज्मा दान करण्याचा निर्णय घेतला. मुलगी प्लाज्मा दान करू शकते, तर आपणही प्लाज्मा दान करू शकतो, असे पवन मंडोरा यांना वाटले. या वयात मुलीने घेतलेल्या सामाजिक निर्णयाचा अभिमान वाटतो, असे मत पवन मंडोरा यांनी व्यक्त केले. तर प्लाज्मा दानामुळे कोणतेही दुष्परिणाम नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांना जीवदान मिळून त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो. मनातील गैरसमज दूर करुन प्लाज्मा दान करावे, असे आवाहन प्लाज्मा दाते मंडोरा पिता-पुत्री व पलोड यांनी केले. याप्रसंगी प्लाज्मादान, रक्तदान, प्लेटसलेट दाते व पत्रकार अय्याज मोहसीन यांचाही सत्कार करण्यात आला.

रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी प्लाज्मा दानाबाबत मार्गदर्शन केले. तर रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन व सचिव विनोद बियाणी यांनी या स्तुत्य उपक्रमाचे व आयोजकांचे कौतुक केले.

या वेळी माहेश्वरी सभेचे शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, शहर सचिव विलास काबरा, प्रोजेक्ट चेअरमन नचिकेत जाखेटिया, अमित बेहडे, बाळकु्ष्ण लाठी, महेश प्रगती मंडळाचे सदस्य आशिष बिर्ला, राजेश राठी, अँड.दीपक फापट आदी उपस्थित होते.

समाधानकारक : जळगाव जिल्ह्यात आज १०३७ रूग्ण झाले बरे; नवीन ९०४ रुग्ण

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज | २ मे २०२१ | जळगाव जिल्ह्यात दिवसभरात ९०४ बाधित रूग्ण आढळून आले असून १ हजार ३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख २३ हजार ८४४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ११ हजार रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १० हजार ३७१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १६ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

आज जळगाव शहर-१४०, जळगाव ग्रामीण- ४१, भुसावळ-९४, अमळनेर-२४, चोपडा-७३, पाचोरा-४२, भडगाव-१५, धरणगाव-३४, यावल-६०, एरंडोल-५७, जामनेर-७९, रावेर-५३, पारोळा-३२, चाळीसगाव-६३, मुक्ताईनगर-४५, बोदवड-२८ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ९०४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पहिल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

0
jalgaon oxigen plant

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२१ । जिल्ह्यातील भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर येथे उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

राज्यात ऑक्सीजनचा तुटवडा भासत असतानाच जळगाव जिल्ह्यात पहिलाच ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आमदार संजय सावकारे यांच्या आमदार निधीतून उभा राहत असल्याची बाब निश्‍चितच आनंददायी असून जिल्ह्यासाठी दिलासादायक असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की,
जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी लागणारा ऑक्सीजन जिल्ह्यातच निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहेत. येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यात दहा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दहा कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेत. भुसावळ येथील या प्रकल्पामुळे रुग्णालयातील रूग्णांना पुरेसा ऑक्सीजन मिळणार आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास अजून एक कोटी नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार असून तेही मंजूर करण्यात येईल. शिवाय या रूग्णालयास सुरक्षित भिंत बांधण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तिसर्‍या लाटेसाठीही सज्ज

पालकमंत्री म्हणाले की, याठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरू झाल्याने भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, मोहाडी रोडवरील महिला रूग्णालय, धरणगाव, पारोळा, भडगाव, रावेर, अमळनेर या दहा ठिकाणी याच धर्तीवर ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभे राहणार असून भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्यासाठी जिल्हा सज्ज आहेत.

जिल्ह्यातील रुग्णांलयामध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात आला असून ग्रामीण रुग्णालयातील विद्युत प्रश्‍नासाठी 48 लाख रुपये आमदारांच्या सूचनेवरून मंजूर करण्यात आले आहेत. यापुढेही आमदार संजय सावकारे व नगरपालिकेतर्फे जी विकास कामे सुचविली जातील ती पूर्ण करण्यासाठी कटीबध्द राहील, असेही पालकमंत्री म्हणाले.

शहर व तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार- आमदार सावकारे

यावेळी आमदार संजय सावकारे म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात आमदार निधीतून उभारण्यात आलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत लक्षात आले होते की, ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागत असतो व वारंवार ऑक्सीजन सिलिंडर भरण्यासाठी पाठवावे लागण्याची बाबही खर्चिक आहे. मात्र आता रुग्णालयातील शंभर बेडसाठी एकाचवेळी ऑक्सीजनची सुविधा पुरवता येणे शक्य झाल्याने शहर व तालुक्यातील रुग्णांनाही दिलासा मिळणार आहे.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. नागोजीराव चव्हाण, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार दीपक धीवरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, बाबासाहेब ठोंबे, रामकृष्ण कुंभार, नगरसेवक मनोज बियाणी तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी, डॉ.नितु पाटील, डॉ.चाकूरकर, डॉ.विक्रांत सोनार आदी उपस्थित होते.

एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार

एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची या प्रकल्पातून निर्मिती होईल. हवेमधून ऑक्सिजन एकत्र करून हा थेट मशीनरीच्या माध्यमातून रुग्णांना पुरविला जाईल. या प्रकल्पामुळे आता बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, त्यामुळे वेळेबरोबरच शासनाच्या निधीची देखील बचत होईल. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली.

बिग ब्रेकिंग : परमबीर सिंग गुन्ह्यात जळगावच्या माजी एलसीबी निरीक्षकांचे देखील नाव

0
param bir singh

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२१ । मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध २२ कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगावचे माजी एलसीबी निरीक्षक बापू रोहोम यांचा देखील संशयितांमध्ये समावेश आहे. अकोल्याचे पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे.

परमबीर सिंग यांच्यावर नेमका आरोप काय?

परमबीर सिंग यांच्या पत्नी यांचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोल्याच्या पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले होते. त्यानंतर दोन दिवसांनी रात्री उशिरा याबाबत अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

जातीवाचक शिवीगाळ केल्याचा दावा

त्यासोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही भीमराज घाडगे यांनी यात म्हटलं आहे. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असा दावा भीमराज घाडगे केला आहे. अकोल्यात दाखल गुन्ह्यात जातीवाचक शिवीगाळ आणि अन्य काही गंभीर प्रकरणांचा आरोप आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल

तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह तब्बल २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला गेला आहे. संशयितांच्या नावांमध्ये जळगावचे माजी एलसीबी निरीक्षक बापू रोहोम यांच्या नावाचा देखील समावेश आहे.