⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

दापोऱ्यातील तरुणाची रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । तालुक्यातील दापोरा येथील तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडलीय.विशाल शांताराम पवार (वय-२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी पोलीसात अकस्माम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दापोरे पो. शिरसाळा येथे विशाल पवार (वय-२७) हा आपल्या आई व बहिणीसह राहतो. शिक्षणासह आईसोबत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जबाजारीतून तो तणावात होता. दरम्यान, २९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता बाहेर जावून येतो असे सागून दुचाकीने घराबाहेर पडला. शिरसोली व दापोरे दरम्यानच्या परिसरात दुचाकी लावून त्याने धावत्‍या रेल्वेखाली येवून आत्महत्या केली.

गँगमन पांडे यांनी तत्काळ रेल्वे स्टेशन मास्तर यांना सांगितले. घटनास्थळी तालुका आणि एमआयडीसी पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. मयताच्या खिश्यातील कागदपत्रांमुळे ओळख पटली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

आजारास कंटाळुन महिलेची विहीरीत उडी मारुन आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । यावल तालुक्यातील दहिगाव येथे ६० वर्षीय महिलेने आजारास कंटाळुन विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे. कोकीळाबाई प्रकाश पाटील (वय-६0) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोकीळाबाई  पाटील यांनी आजाराला कंटाळुन नायगाव रोडवरील दहीगाव शिवारातील राजु दगडु पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. याबाबत मयत महीलेचे मेहुणे छन्नु पाटील राहणारे नेरी ता . जामनेर यांनी दिलेल्या महितीनुसार यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस कर्मचारी असलम खान हे करीत आहे.

रेमंडच्या इंद्रपालसिंग कोहली यांना वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण मानांकन

0
indrapalsing kohli

रेमंड कंपनीमधील इंजिनीयर श्री इंद्रपालसिंग कोहली यांनी बेंच प्रेस व डेट फिट या वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग नोंदवला होता आणि या दोन्ही स्पर्धेमध्ये त्यांना सुवर्ण मानांकन प्राप्त झालेले आहे.

आणि या स्पर्धेमध्ये यश मिळवल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आलेली आहे .पुढील स्पध्रेसाठी आंतरराष्ट्रीय लेव्हलला भारतात भारताचे प्रतिनिधित्व ते करतील.

या स्पर्धेमध्ये नव्वद पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता तरी यामध्ये १२० किलो वजनाच्या  व १८० किलो वजनाच्या गटात त्यांनी हे यश मिळवलेले आहे.

या दोन्ही स्पध्रेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे रेमंड कंपनीचे वाईस प्रेसिडेंट श्री हरीश चॅटर्जी व रेमंड जळगावचे  डायरेक्टर श्री अनिल नारखेडे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

लॉकडाऊनचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना लुटले !

0
jalgaon news

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । जळगाव शहरातील फळ गल्ली परिसरात लॉकडाऊनचे चित्रीकरण करणाऱ्या न्यूज पोर्टलच्या पत्रकाराचा मोबाईल आणि कॅमेरा घेऊन दुचाकीस्वार तिघांनी पळ काढल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कंजरवाडा समोर मुख्य रस्त्यावर देखील एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावून दुचाकीस्वारांनी पळ काढल्याची घटना घडली.

शेरा चौकातील रहिवासी अल्ताफ इस्माईल शेख वय-३० वर्षे हे क्राईम नोट या साप्ताहीक वृत्तपत्र व युटुबच्या न्यूज चॅनेलला रिपोर्टर म्हणुन काम करतात. दि.२९ रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास ते पत्रकार तन्वीर पिंजारी यांच्यासह साने गुरुजी चौकातील फळ गल्लीत  लॉकडाऊन बाबतचा आढाव्याचे मोबाईलने चित्रीकरण करीत होते.

मोबाईलला सपोर्ट म्हणुन त्यांनी तन्वीर पिंजारी यांचा फोटो काढण्याचा कॅमेरा डाव्या हातात पकडलेला होता. काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तिघांनी अल्ताफच्या हातातील मोबाईल आणि कॅमेरा हिसकावून टॉवर चौकाकडे पळ काढला. दोघांनी धावत जात दुचाकीचा पाठलाग केला परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. दुचाकींचा क्रमांक ३३१२ इतकाच दिसला असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक भिमराव नांदूरकर करीत आहे.

सलग दुसऱ्या वर्षी होळीच्या उत्सवावर पडले विरजण

0
holi utsav

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । यंदा सलग दुसऱ्या वर्षी होळीच्या उत्सवावर विरजण पडले. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांचा लॉकडाउन जारी केला. रविवारी पहाटेपासून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत हा लॉकडाउन लागू राहील. ऐन होळीच्या उत्सवात लॉकडाउन जारी करणे गर्दी टाळण्यासाठी स्वाभाविक होते.

होळी, धूलिवंदनसाठी गर्दी होऊ नये म्हणून हे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले. त्या मुळे रविवारी होळी अगदीच मर्यादित स्वरूपात साजरी झाली. मात्र, धूलिवंदनाला रंगांमध्ये भिजणारे जळगाव शहर, जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि विशेषतः आदिवासी पट्ट्यात रंगांचा बेरंग झाल्याचे दिसून आले. रंगांच्या छटांनी माखलेल्या चेहऱ्यांवरील आनंदाचे डोह तरंगतानाचे चित्र यंदा नव्हते. हे चौक ओस पडलेय.

गेल्या वर्षी धूलिवंदनच्या दरम्यान कोरोनाचे रुग्ण नव्हते; पण दहशत होती. लॉकडाउन नव्हते; पण होळीचा हवा तसा उत्साह नव्हता. यंदा देशभरात अन्यत्र होळीच्या रंगांची उधळण होत असताना महाराष्ट्र व विशेषतः जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग तीव्रतेने वाढत आहे.

यंदा सलग दुसऱ्या वर्षी होळीच्या उत्सवावर विरजण पडले. जळगाव शहरात दर वर्षी नेहरू चौक, काव्यरत्नावली चौक, जुने जळगाव, नागरी वस्त्यांमधील भागात धूलिवंदनाचा उत्साह शिगेला पोचलेला असतो. सोमवारचे चित्र मात्र सुन्न करणारे होते. रस्त्यांवरील शुकशुकाट, घरात बसलेली तरुणाई आणि स्वच्छंद बागडणाऱ्या मुलांचे घरातच हिरमुसलेले चेहरे… असे विदारक चित्र अनुभवाला मिळाले.

जळगाव जिल्ह्यात आज १२०५ नवे बाधित रुग्ण, १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । जिल्ह्यातील कोरोनाचा विस्‍फोट सुरूच आहे. आज दिवसभरात तब्बल १२०५ नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दोन्ही आकडे या टप्प्यातील विक्रमी व धडकी भरविणारे आहेत.

जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा वाढता आलेख चिंता वाढविणारा आहे. साधारण फेब्रुवारीपासून संसर्ग हा वाढताच आहे. सातत्‍याने आकडा वाढत असून संपुर्ण जिल्‍हाच आता हॉटस्‍पॉट बनला आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८६ हजार ६८८ झाली आहे. त्यात एकूण ७३ हजार ६६५ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत असून सद्यस्‍थितीत ११ हजार ४२६ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज पुन्हा जिल्ह्यात १४ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १ हजार ५९७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रुग्ण :

जळगाव शहर २८०, जळगाव तालुका-५०; भुसावळ ३६, अमळनेर- ९३; चोपडा- ३९२; पाचोरा ३३; भडगाव ६३; धरणगाव २९; यावल २६; एरंडोल २०,  जामनेर ६१; रावेर ३७, पारोळा १०; चाळीसगाव २६; मुक्ताईनगर ३०; बोदवड-१६ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे १२०५ रूग्ण आढळून आले आहेत.

अमळनेर येथील दोन वर्षीय बालकाचा कोरोनामुळे मृत्‍यू

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येसह मृताच्या संख्येने स्थिती चिंताजनक बनली आहे.दरम्यान, जिल्‍ह्‍यात एका बालकाला कोरोनाची लागण होवून मृत्‍यू झाल्‍याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे.

अमळनेर येथील दोन वर्षीय बालकाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारादरम्‍यान शनिवारी रात्री मृत्‍यू झाला. या बाळाला मागील आठ दिवसांपासून आजारी होता. त्‍यास न्युमोनियाची लागण झाल्‍याचे रिपोर्टमध्ये स्‍पष्‍ट झाले होते. मात्र त्‍याची पहिली कोरोना टेस्‍ट निगेटीव्ह आली. अशा स्‍थितीत त्‍यास खासगी रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र बाळाची प्रकृती अधिक खालावली असल्‍याने उपचार करण्यास नकार दिला. यानंतर त्‍यास शुक्रवारी (२६ मार्च) शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. येथे त्‍यास व्हेंटीलेटर लावण्यात आले होते. मात्र उपचाराचा फरक न पडल्‍याने बाळाचा चोवीस तासाच्या आत मृत्‍यू झाला.

रोनाचा अधिक त्रास वृद्ध किंवा आजार असलेल्‍यांना जाणवत असल्‍याचे पहिल्‍या लाटेत सांगण्यात येत होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्‍यानंतर यात बाधित होणाऱ्यांमध्ये युवक वर्गाचे प्रमाण अधिक वाढले आहे. इतकेच नाही तर कोरोनामुळे मृत्‍यू होण्याचा धोका देखील अधिक वाढला आहे.

ध्येय जलयुक्त शिवाराचे, रोटरी जळगाव ईस्टचे अभियान

0
rotary jalgaon east campaign

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । रोटरी जळगाव ईस्ट मागील ५/६ वर्षांपासुन ग्रामीण भागात ध्येय जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्यापासुन झुरखेडा पर्यंत जवळपास १८ किमी नाला व नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे काम केलेले आहे.

एकावेळेस पाऊस पडल्याने रुंदीकरण व खोलीकरण मुळे जवळपास ६० करोड लिटर पाणी  अडविल्याने जमिनीत जिरवले जाते. अशाप्रकारे पावसाळ्यात कमीतकमी ५०० करोड लिटर पाणी वाचविले जाते. साधारणतः ४० ते ४५ स्के.किमी परिसर जलयुक्त झालेला आहे. यामुळे मुसळी, वराड, एकलग्न शिवार, बोरखेडा, वंजारी, खपाट व झुरखेडा परिसरातील ग्रामस्थांना भरपुर फायदा झाला.

रोटरी जळगाव ईस्ट च्या या अभियानामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांना अत्याधिक फायदा झाला. परिसरातील विहीरींचे पाणी नोव्हेंबर, डिसेंबर मध्येच  संपत असल्याने शेतकरी फक्त पावसाळ्यात एक पीक घेत होते ते आता एका वर्षात दोन किंवा तीन पीक घेऊ लागले आहेत. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला असुन गुरांसाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे , एकंदरीत संपुर्ण परिसरात आनंदी वातावरण आहे. सदरहु कामांसाठी मुख्यतः नाम फाऊंडेशन, मेरिको इंडस्ट्रीज यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

यासाठी रोटरी जळगाव ईस्ट चे अध्यक्ष भावेश शहा, सचिव हितेश्वर, डाँ प्रताप जाधव, संजय शहा, सुनिल शहा, वर्धमान भंडारी , संजय गांधी , डाँ जगमोहन छाबडा, विनोद पाटील,  विजय लाठी, सचिन खडके, गोविंद वर्मा, गिरीश शिंदे नितेश जैन राजेश सांखला, विरेंद्र छाजेर, स्वप्नील जाखेटे, डाँ राहुल भंसाली, सचिन जेठवानी यांनी परिश्रम घेतले.

यासाठी ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

यावर्षी सुध्दा ध्येय जलयुक्त शिवाराचे अंतर्गत काम करावयाचे असुन ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे. त्यांनी माजी अध्यक्ष संजय शहा, प्रेमजी भवानजी, ९ कृषी ऊत्पन्न बाजार समिती, जळगाव मो.८२०८२६६५११  येथे त्वरित संपर्क साधावा असे अहवान रोटरी ईस्टचे अध्यक्ष भावेश शहा यांनी केले आहे.

चोरीचा प्रयत्न फसला ; एक महिन्यापासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0
jalgaon crime

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । शिवाजी नगर हुडको परिसरातील घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या व एक महिन्या पासून फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. जुबेर शेख भिकन उर्फ डबल (वय 20 रा. गेंदालाल मील) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या जुबेर शेखल हा दिल्लीगेट लक्ष्मी नगर परिसरात आल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार अक्रम शेक, पोलिस नाईक भास्कर ठाकरे यांना मिळाली होती. त्यांनी सदर भागात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विजय निकुंभ करीत आहे.