⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

ध्येय जलयुक्त शिवाराचे, रोटरी जळगाव ईस्टचे अभियान

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । रोटरी जळगाव ईस्ट मागील ५/६ वर्षांपासुन ग्रामीण भागात ध्येय जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्यापासुन झुरखेडा पर्यंत जवळपास १८ किमी नाला व नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे काम केलेले आहे.

एकावेळेस पाऊस पडल्याने रुंदीकरण व खोलीकरण मुळे जवळपास ६० करोड लिटर पाणी  अडविल्याने जमिनीत जिरवले जाते. अशाप्रकारे पावसाळ्यात कमीतकमी ५०० करोड लिटर पाणी वाचविले जाते. साधारणतः ४० ते ४५ स्के.किमी परिसर जलयुक्त झालेला आहे. यामुळे मुसळी, वराड, एकलग्न शिवार, बोरखेडा, वंजारी, खपाट व झुरखेडा परिसरातील ग्रामस्थांना भरपुर फायदा झाला.

रोटरी जळगाव ईस्ट च्या या अभियानामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांना अत्याधिक फायदा झाला. परिसरातील विहीरींचे पाणी नोव्हेंबर, डिसेंबर मध्येच  संपत असल्याने शेतकरी फक्त पावसाळ्यात एक पीक घेत होते ते आता एका वर्षात दोन किंवा तीन पीक घेऊ लागले आहेत. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला असुन गुरांसाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे , एकंदरीत संपुर्ण परिसरात आनंदी वातावरण आहे. सदरहु कामांसाठी मुख्यतः नाम फाऊंडेशन, मेरिको इंडस्ट्रीज यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

यासाठी रोटरी जळगाव ईस्ट चे अध्यक्ष भावेश शहा, सचिव हितेश्वर, डाँ प्रताप जाधव, संजय शहा, सुनिल शहा, वर्धमान भंडारी , संजय गांधी , डाँ जगमोहन छाबडा, विनोद पाटील,  विजय लाठी, सचिन खडके, गोविंद वर्मा, गिरीश शिंदे नितेश जैन राजेश सांखला, विरेंद्र छाजेर, स्वप्नील जाखेटे, डाँ राहुल भंसाली, सचिन जेठवानी यांनी परिश्रम घेतले.

यासाठी ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

यावर्षी सुध्दा ध्येय जलयुक्त शिवाराचे अंतर्गत काम करावयाचे असुन ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे. त्यांनी माजी अध्यक्ष संजय शहा, प्रेमजी भवानजी, ९ कृषी ऊत्पन्न बाजार समिती, जळगाव मो.८२०८२६६५११  येथे त्वरित संपर्क साधावा असे अहवान रोटरी ईस्टचे अध्यक्ष भावेश शहा यांनी केले आहे.