⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

अमळनेर येथील दोन वर्षीय बालकाचा कोरोनामुळे मृत्‍यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येसह मृताच्या संख्येने स्थिती चिंताजनक बनली आहे.दरम्यान, जिल्‍ह्‍यात एका बालकाला कोरोनाची लागण होवून मृत्‍यू झाल्‍याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे.

अमळनेर येथील दोन वर्षीय बालकाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारादरम्‍यान शनिवारी रात्री मृत्‍यू झाला. या बाळाला मागील आठ दिवसांपासून आजारी होता. त्‍यास न्युमोनियाची लागण झाल्‍याचे रिपोर्टमध्ये स्‍पष्‍ट झाले होते. मात्र त्‍याची पहिली कोरोना टेस्‍ट निगेटीव्ह आली. अशा स्‍थितीत त्‍यास खासगी रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र बाळाची प्रकृती अधिक खालावली असल्‍याने उपचार करण्यास नकार दिला. यानंतर त्‍यास शुक्रवारी (२६ मार्च) शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. येथे त्‍यास व्हेंटीलेटर लावण्यात आले होते. मात्र उपचाराचा फरक न पडल्‍याने बाळाचा चोवीस तासाच्या आत मृत्‍यू झाला.

रोनाचा अधिक त्रास वृद्ध किंवा आजार असलेल्‍यांना जाणवत असल्‍याचे पहिल्‍या लाटेत सांगण्यात येत होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्‍यानंतर यात बाधित होणाऱ्यांमध्ये युवक वर्गाचे प्रमाण अधिक वाढले आहे. इतकेच नाही तर कोरोनामुळे मृत्‍यू होण्याचा धोका देखील अधिक वाढला आहे.