⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

मुस्लिम मनियार बिरादरीच्या पुढाकाराने ७४९ रुपयात रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध

0
covid 19 drug remdesivir

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेत अकोला येथील दत्त मेडिकल जर ७५० रूपयांना इंजेक्शन देत असेल तर जळगावला का मिळू शकत नाही ? हा विषय चर्चिला जात होता.

सदर बाबत जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन सर्वप्रथम १०५०/ रुपयात उपलब्ध करून दिला असल्याने त्यांनी या चर्चेत जळगावातील आपल्या मित्र परिवार व मुंबई येथील मित्र परिवार यांच्या सहकार्याने जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन हे ७४९/- रुपयात उपलब्ध करून दिले व आज मंगळवारी सदरचे इंजेक्शन जळगावातल्या के परविन मेडिकल स्टोरमध्ये विक्रीला उपलब्ध केले आहे.

सदर चे इंजेक्शन घेणे साठी मेडिकल स्टोअर ला कुपन दिल्यावरच त्यांना इंजेक्शन मिळणार आहे. जे रुग्ण अगदी गरीब असून रेमडेसिव्हर चा खर्च उचलू शकत नाही त्यांना संपूर्ण ६ इंजेकशन मोफत देण्यात येईल असे सुद्धा फारूक शेख यांनी प्रसिद्धीला दिलेले आहे.

सिटी स्कॅन व रक्त तपासणी साठी विशेष सूट

बिरादरी ने यापूर्वी एच आर सिटी तपासणी सुद्धा फक्त १८००/- रुपयात व सम्पूर्ण कोविड रक्त तपासणी फक्त १३००/- रुपयात उपलब्ध करून दिलेली आहे.

जळगाव मुस्लिम मनियार बिरादरी च्या कोविड रुग्णा साठी महाराष्ट्रात जळगाव मानियार पॅटर्न म्हणून ओळखले जात आहे. अधिक माहिती साठी संपर्कासाठी ९४२३१८५७८६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

remdesivir injection

महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आ.मंगेश चव्हाण यांची कारागृहात रवानगी

0
mangesh chavan

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । महावितरण अधिक्षक अभियंत्यांना खूर्चीत बांधून मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांची आज नाशिक कारागृहात रवानगी केली आहे.

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी २६ मार्च रोजी महावितरणच्या कार्यालयात आमदार चव्हाण यांच्यासह सुमारे ४० ते ५० जणांना जमाव गेला होता. यावेळी आमदारांसह जमावातील शेतकऱ्यांनी फारुख यांना दोरीने खुर्चीत बांधुन मारहाण केली. चपलांचा हार घातला. या प्रकरणी फारुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चव्हाणांसह ३१ जणांना अटक केली हीती. अटकेतील सर्व संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. यामुळे त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. सुनावणीअंती न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली.

जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे आणखी ३१ जणांना ठेऊन घेणे गैरसोयीचे होणार होते. त्यामुळे आमदार चव्हाण यांच्यासह सर्व ३१ संशयितांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले.न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांतर्फे एकत्र जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य द्यावे ; आरपीआय

0
anil adakmol

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीबांना राज्य सरकारने सवलतीच्या दरात अन्नधान्य द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्न मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे त्यामुळे जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन करण्यात येत असल्याने सर्व उद्योग बंद असल्याने सर्व सामान्य गोरगरीबांना यांचा फटका बसत आहे. अशातच शासन अंत्योदय,बी,पी,एल,व अन्न सुरक्षा योजना अंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप करीत आहे. मात्र, केशरी शिधापत्रिका धारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याने

राज्यशासनाने सवलतीच्या ८ रूपये किलो गहू १२ रुपये तांदूळ ५५ रूपये चनादाळ व २०रूपये दराने साखर स्वस्त धान्य दुकानाद्धारे वितरित करण्यात यावे. जेणेकरून कोरोनाच्या माहामारीत शेतमजूर, धुणीभांडी करणारेही महिला, विटभट्टी कामगार झोपडपट्टी भागात राहणाऱ्याना गरीबांना मोठा आधार मिळेल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पत्रकाराला लुटणारा भामटा एलसीबीकडून गजाआड !

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । शहरातील फळ गल्ली परिसरात लॉकडाऊनचे चित्रीकरण करणाऱ्या न्यूज पोर्टलच्या पत्रकाराचा मोबाईल आणि कॅमेरा घेऊन दुचाकीस्वार तिघांनी पळ काढल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. एलसीबीच्या पथकाने एकाला मध्यरात्री अटक केली असून त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

शेरा चौकातील रहिवासी पत्रकार अल्ताफ इस्माईल शेख वय-३० वर्षे हे दि.२९ रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास ते पत्रकार तन्वीर पिंजारी यांच्यासह साने गुरुजी चौकातील फळ गल्लीत लॉकडाऊनबाबत आढाव्याचे मोबाईलने चित्रीकरण करीत होते. काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तिघांनी अल्ताफच्या हातातील मोबाईल आणि कॅमेरा हिसकावून टॉवर चौकाकडे पळ काढला. होता. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवली.

एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांनी गुप्त माहिती काढली असता आकाश उर्फ नाकतोडा संजय मराठे वय-२१ रा.चौघुले प्लॉट याचे नाव समोर आले. पथकाने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल मिळून आला.

कल्पेश उर्फ बाळू देविदास शिंपी आणि एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने ओळखीचा मित्र विक्रम भाटी याच्याकडून खाजगी कारण सांगत मागून आणलेल्या दुचाकीवर चोरली असल्याची त्याने कबुली दिली आहे. एलसीबीच्या पथकाने आकाशला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.

सावदा येथील “त्या” हॉटेलवर पुन्हा मद्य विक्री

0
savada news

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । सावदा येथे 3 दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू असून दि 28 रोजी पहिल्या दिवशी होळी असतांना देखील  नागरिकांनी शहर कडकडीत बंद ठेवले होते. मात्र ब-हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावरील एका हॉटेल मध्ये मात्र सर्रास मद्य विक्री सुरू होती. याबाबत जळगाव लाईव्हने सकाळी बातमी प्रसिद्ध करताच दुपारी येथील मद्य विक्री प्रशासनाने बंद केली होती.

मात्र, दि 29 रोजी सकाळी प्रशासनाचे दुर्लक्ष होताच या हॉटेलच्या मागील प्रवेशद्वारा जवळ बाहेर उभे राहून तेथून मद्य विक्री सुरू असल्याचे दिसून आले तर हॉटेल बंद केल्यावर हॉटेल मागील नगर पालिकेच्या शॉपिंग कॉप्लेक्सचे काम सुरू असून तेथे उभे राहून विना क्रमांकाचे स्कुटी वर उघड्यावर मद्य विक्री सुरू केली.  त्यामुळे या हॉटेल चालका वर काल नेमकी काय कार्यवाही करण्यात आली हा प्रश्न निर्माण झाला असून, या हॉटेल जवळ मद्य विक्रीचा कोणताही परवाना नसतांना लॉकडाऊन मध्ये सर्रास मद्य विक्री सुरू राहते व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असते हे दुर्लक्ष नेमके कश्या मुळे केले जात आहे.

याबाबतही आता यामुळे प्रश्न निर्माण होत आहे, एकीकडे परमीट धारक, नियम पाळून आपली दुकाने बंद ठेवीत असताना सदर हॉटेल चालक चक्क विनापरवाना मद्य विक्री नेमकी कोणाच्या पाठबळावर करीत आहे? याकडे देखील लक्ष पुरविणे आता गरजेचे असून सदर ठिकाणी वर्षभर अगदी सरकारी दुकाना बंद असताना देखील विक्री सुरू असते त्याचेच उदाहरण येथे आज दिसून आले लॉकडाऊन मध्ये देखील येथे मद्य विक्री सुरू होती. तसेच प्रशासनाचे आदेश डावलून पार्सल च्या नावाखाली रात्री उशिरा पर्यंत सुरू राहत असते मात्र प्रशासन झोपी गेल्याचे सोंग करतांना दिसून येत असल्याने आता नियम पाळणारे नागरिकात मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; आरोपीस अटक

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । चोपडा तालुक्यातील शेवरे बुद्रुक येथे घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून तिचा खून केल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान, या प्रकरणी अडावद पोलीसांनी पतीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

शेवरे बुद्रुक येथील रहिवाशी नारायण केऱ्या भिलाला (वय ४०) हा पत्नी गणुबाई भिलाला आणि मुलगा निलेश भिलाला यांच्यासह राहातात. नारायण यांना दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे घरात नेहमी वाद होत असतात.

२९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता घरगुती वादातून नारायण भिलाला यांनी संतापाच्या भरात पत्नी गणुबाई यांच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाडीने घाव घातले. यात त्या गंभीर जखमी झाले. जखमीवस्थेत मुलगा निलेश याने तातडीने उपजिल्हा रूग्णालयाने नेले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

गुन्ह्यातील संशयित आरोपी नारायण भिलाला याला अडावद पोलीसांनी अटक केली आहे. निलेश भिलाला यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्याग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरण दांडगे करीत आहे.

मला ईडीच्या तारखा पाहून कोरोना होत नाही; गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर खोचक टीका

0
girish mahajan eknath khadse

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । मला एकनाथ खडसेंसारखं ईडीच्या तारखा पाहून कोरोना होत नसल्याची खोचक टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंनवर केली.

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना महाजन यांनी खडसेंना टार्गेट केले. मला एकदाच कोरोना झाला आणि मी सरकारी रुग्णालयात उपचार घेतला. खडसेंसारखं मी खाजगी उपचार घेत नसल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. मी खोटे कोरोना रिपोर्ट देऊन मुंबईत फिरत नसल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

यावेळी आ.राजुमामा भोळे, आ.चंदूभाई पटेल, माजी महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, नगरसेवक कैलास सोनवणे, धीरज सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 पहा व्हडिओ : 

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1039021453588710/

रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात आव्हाने येथील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

0
avhane

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । शेतात दादर कापणीसाठी गेलेल्या आव्हाने येथील ३० वर्षीय शेत मजुरावर रानडुकराने हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. कैलास उत्तम नाईक (वय-३०) असे मृत शेतमजुराचे नाव आहे.  ही घटना आज मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमरास घडलीय.

कैलास नाईकहा तरूण शेतकरी आज मंगळवार ३० मार्च रेाजी आपल्या कुटुंबियासह शेतात दादर कापणीसाठी गेले होते. सकाळी ११ वाजता आई वडील पत्नीसह काही मजूरांसक दादर कापत असतांना शेताच्या बांधावर लपलेल्या मोठ्या रानडुकराने अचानक केलेल्या हल्ल्यात कैलास गंभीर जखमी झाला.

तातडीने त्याला जिल्हा रूग्णलयात नेत असतांना आव्हाणे फाट्याजवळ त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आव्हाने शिवारातील शेतकरी भयभित झाले आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह नेण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. मयताच्या पश्चात पत्नी वंदना, आई, वडील उत्तम नाईक आणि तीन अपत्ये (दोन मुली व एक मुलगा) असा परिवार आहे.

जळगावात झोपलेल्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याच्या पोतसह रोकडा लंपास

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे.  शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील जोशी कॉलनीत मध्यरात्री वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत आणि साडेबारा हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज मंगळवार ३० मार्च रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

प्रकाश छबीदास भावसार (वय ६२ रा. जोशी कॉलनी, सिंधी कॉलनीजवळ जळगाव), यांची घरासमोर दुधाची डेअरी आहे. २९ मार्च रोजी घरात पत्नी व आईसह जेवण करून ते रात्री ११ वाजता झोपले. प्रकाश भावसार यांची आई इंदूबाई भावसार ह्या घराच्या वरच्या खोलीत एकट्या झोपतात.

मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असतांना अज्ञात चोरट्याने वरच्या घरात प्रवेश करून इंदूबाई यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची मंगलपोत आणि साडेबारा हजार रूपयांची रोकड असा एकुण अंदाजे ७० हजार रूपयांचा मुद्देमाला चोरून नेला. हा प्रकार आज मंगळवार ३० मार्च रोजी सकाळी उघडकीला आला.

चोरट्याने घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त केले होते. प्रकाश भावसार यांनी एमआयडीसी पोलीसात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.