⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

सावदा येथील “त्या” हॉटेलवर पुन्हा मद्य विक्री

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । सावदा येथे 3 दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू असून दि 28 रोजी पहिल्या दिवशी होळी असतांना देखील  नागरिकांनी शहर कडकडीत बंद ठेवले होते. मात्र ब-हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावरील एका हॉटेल मध्ये मात्र सर्रास मद्य विक्री सुरू होती. याबाबत जळगाव लाईव्हने सकाळी बातमी प्रसिद्ध करताच दुपारी येथील मद्य विक्री प्रशासनाने बंद केली होती.

मात्र, दि 29 रोजी सकाळी प्रशासनाचे दुर्लक्ष होताच या हॉटेलच्या मागील प्रवेशद्वारा जवळ बाहेर उभे राहून तेथून मद्य विक्री सुरू असल्याचे दिसून आले तर हॉटेल बंद केल्यावर हॉटेल मागील नगर पालिकेच्या शॉपिंग कॉप्लेक्सचे काम सुरू असून तेथे उभे राहून विना क्रमांकाचे स्कुटी वर उघड्यावर मद्य विक्री सुरू केली.  त्यामुळे या हॉटेल चालका वर काल नेमकी काय कार्यवाही करण्यात आली हा प्रश्न निर्माण झाला असून, या हॉटेल जवळ मद्य विक्रीचा कोणताही परवाना नसतांना लॉकडाऊन मध्ये सर्रास मद्य विक्री सुरू राहते व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असते हे दुर्लक्ष नेमके कश्या मुळे केले जात आहे.

याबाबतही आता यामुळे प्रश्न निर्माण होत आहे, एकीकडे परमीट धारक, नियम पाळून आपली दुकाने बंद ठेवीत असताना सदर हॉटेल चालक चक्क विनापरवाना मद्य विक्री नेमकी कोणाच्या पाठबळावर करीत आहे? याकडे देखील लक्ष पुरविणे आता गरजेचे असून सदर ठिकाणी वर्षभर अगदी सरकारी दुकाना बंद असताना देखील विक्री सुरू असते त्याचेच उदाहरण येथे आज दिसून आले लॉकडाऊन मध्ये देखील येथे मद्य विक्री सुरू होती. तसेच प्रशासनाचे आदेश डावलून पार्सल च्या नावाखाली रात्री उशिरा पर्यंत सुरू राहत असते मात्र प्रशासन झोपी गेल्याचे सोंग करतांना दिसून येत असल्याने आता नियम पाळणारे नागरिकात मात्र नाराजी व्यक्त होत आहे.