घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; आरोपीस अटक

मार्च 30, 2021 2:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । चोपडा तालुक्यातील शेवरे बुद्रुक येथे घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून तिचा खून केल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान, या प्रकरणी अडावद पोलीसांनी पतीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

शेवरे बुद्रुक येथील रहिवाशी नारायण केऱ्या भिलाला (वय ४०) हा पत्नी गणुबाई भिलाला आणि मुलगा निलेश भिलाला यांच्यासह राहातात. नारायण यांना दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे घरात नेहमी वाद होत असतात.

२९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता घरगुती वादातून नारायण भिलाला यांनी संतापाच्या भरात पत्नी गणुबाई यांच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाडीने घाव घातले. यात त्या गंभीर जखमी झाले. जखमीवस्थेत मुलगा निलेश याने तातडीने उपजिल्हा रूग्णालयाने नेले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

गुन्ह्यातील संशयित आरोपी नारायण भिलाला याला अडावद पोलीसांनी अटक केली आहे. निलेश भिलाला यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्याग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरण दांडगे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now