गुन्हेएरंडोल

एका झोक्यात तीन बहिणी खेळत होत्या, अचानक झोका तुटला अन् अनर्थच घडला

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । साडीच्या झोक्यात तीन बहिणी खेळत असताना अचानक झोका तुटला आणि यात तीन्ही बहिणींपैकी दीड वर्ष असलेल्या एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एरंडोल तालुक्यात असलेल्या सावदे प्र.चा येथे घडलीय. तर इतर दोन मुली जखमी झाल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अचर्ना धनसिंग पावरा वय -दीड वर्ष असे मयत बालिकेचे नाव आहे.

savde news jpg webp

नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकलीचे आई-वडील पंधरा वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांची शेती बटाईने करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी सकाळी दोघंही शेतात गेले असता चिमुकलीची आजी आणि त्या तीन चिमुकल्या मुलीच घरी होत्या. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीद्वारे केलेल्या झोक्यात तीनही मुली खेळत असतानाच अचानक साडीचा झोका तुटला.

या घटनेत दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला व तिच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. दोघींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत चिमुकलीवर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कोणताही गुन्हा अद्याप नोंदवण्यात आला नाहीये.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button