⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

मारहाण करत विवाहितेचा विनयभंग, तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशातच कौटुंबिक वादानंतर 30 वर्षीय विवाहितेला मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी दीरासह सासु-सासर्‍यांविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 9 मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.

काय आहे घटना?

यावल तालुक्यातील न्हावी येथील 30 वर्षीय विवाहिता या पती व मुलांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 9 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास विवाहितेचे सासरे त्यांना दारूचे व्यसन असल्याने घरात त्यांचा कौंटुबिक वाद निर्माण झाला. यावरून विवाहितेचा दिराने विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण केली व विनयभंग केला. भांडण सोडवण्यासाठी विवाहितेचा पती आला असता त्यालादेखील मारहाण केली आणि मुलांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

याप्रकरणी विवाहितेने फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर फैजपूर पोलिस ठाण्यात दीर, सासू आणि सासरे यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश भराटे करीत आहे.