जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२५ । राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. मात्र अद्यापही भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष ठरला नाहीय. चंद्रशेखर बावनकुळे हे महायुती सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागला आहे. मात्र अशातच नवा प्रदेशाध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. आता उद्या संध्याकाळी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे.

याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक सुरु झाली आहे. यासाठी केंद्रिय मंत्री किरण रिजिजू आले आहेत. त्यांच्या समोर आम्ही रविंद्र चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. जे यापूर्वी मंत्री होते, त्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती, त्यानंतर ते नगरसेवक झाले, नंतर आमदार झाले. आज प्रदेशाध्यक्षरदासाठी आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे.’

पुढे बोलताना फडणवीसांनी म्हटले की, ‘मागच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम केलं आहे, त्यांनी चांगल्या प्रकारे संघटना बांधली, याचा परिणाम विधानसभा निवडणूकीत दिसून आली. त्यानंतर रविंद्र चव्हाण यांची कार्याध्यक्ष म्हणून काम केलं. आज आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे. उद्या संध्याकाळी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल.’












