---Advertisement---
जळगाव जिल्हा

एसटी स्टँड धुणारा, झाडू मारणारा.. ; भाजप प्रवक्ते चव्हाण उन्मेष पाटीलांवर बरसले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काल (३ एप्रिल) उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत करण पवार आणि शेकडो समर्थकांनी शिवबंधन हाती बांधलं आहे. यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगावात भाजपला मोठा हादरा बसला आहे. दरम्यान, भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटलांवर जोरदार टीका केलीय.

Ajit Chavan Unmesh Patil 1 jpg webp

आंदोलन करणारा एसटी स्टँड धुणारा झाडू मारणारा आणि तिथून कुठेतरी वर्तमानपत्रात चौकटीत आपलं नाव छापून येतंय का? यासाठी धडपडणार कार्यकर्ता उन्मेष पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांनी व भाजपाने आमदार खासदार केला, असा टोला अजित चव्हाण यांनी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे

---Advertisement---

सातत्याने उन्मेष पाटील यांना भाजपने पद दिलीत त्यांनी पक्ष सोडण्याची घाई केली. आमच्या आताचे उमेदवार स्मिता वाघ याचं मागच्या काळात पक्षाने तिकीट कापले होते ते अतिशय उत्तम उदाहरण आहे की संयम बाळगला तर भाजपा कसं भरभरून देते. आता घेणाऱ्यांची झोळी फाटलेली असेल त्याला आम्ही काय करू शकत नाही, असंही अजित चव्हाण म्हणाले. उन्मेष पाटील यांना थोडी वाट बघायची सवय जर नसेल थोडी कळ काढायची सवय जर नसेल तर माझं प्रति आवाहन आहे. खानदेशी जनता त्यांना उत्तर देईल अशी टीका अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांच्यावर केली आहे

खडसेंच्या भाजप वापसीवर मोठा खुलासा
दरम्यान यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीवर मोठा खुलासा केला आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी ते दिल्ली मधील नेत्यांच्या गाठी भेटी घेत असल्याचा खुलासा भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी भाजपा मध्ये येण्यासाठी भाजपा त्यांच्या घरी बोलवायला गेली नव्हती मात्र त्यांच्या कडून भाजपा मध्ये येण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांना भाजपमध्ये घ्यावे कि नाही हा भाजपाच्या पक्षश्रेष्ठी यांचा निर्णय असणार आहे. जो निर्णय घेतला जाईल तो कार्यकर्त्यांना मान्य असेल असेही ते यावेळी म्हणाले

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---