⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | बातम्या | अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा ; वाचा काय आहेत..

अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा ; वाचा काय आहेत..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२४ । राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत शिंदे सरकारचा 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा करण्यात आलीय. अजित पवार यांनी शेतकरी वीज माफीचा निर्णय जाहीर केला आहे. शेती कृषी पंपाचे बिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच शेतकऱ्यांना गेल्यावर्षी कापूस आणि सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त होते. पण शेतकऱ्यांच्या मनस्तापाचा विचार करुन शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. “कापूस आणि सोयाबीन पिकाचा राज्याच्या उत्पन्नात वाटा आहे. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नुकसान सोसावं लागलं होतं. आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मागेच कॅबिनेटने निर्णय घेतला होता. पण आचारसंहिता लागली होती. आता कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजार देणार आहोत. कांदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०० कोटी रुपयांचा फिरता निधी तयार केला जाणार आहे”, अशी मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

ई पंचनामा योजना राज्यभरात राबवण्यात येणार आहे. शेतमालाच्या स्थानिक पातळीवर माल साठवणुकीसाठी गाव तिथे गोदाम योजना राबवणार आहोत. त्यासाठी १०० गोदामांची दुरुस्ती करणार आहोत”, असं अजित पवार आज विधानसभेत म्हणाले.“शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावी यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल. या योजने करता ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे”, अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली.

“नवीन दुग्धव्यवसाय योजना सुरु केली जाईल. नवा उद्योजक निर्माण करताना शेतकऱ्यांमध्ये प्रोत्साहन देण्याचे काम करणार. प्रती लिटर ५ रुपये अनुदान दिले होते. राहिलेले अनुदान त्वरित वितरित केले जाईल. एक लीटर ५ रुपये प्रमाणे १ जुलैपासून अनुदान योजना सुरु केले जाईल”, अशी घोषणादेखील अजित पवार यांनी यावेळी केली.“बांबूची लागवड केली जाणार आहे. ⁠प्रती रोपाकरता १७५ रुपये अनुदान दिले जाईल. वन्यप्राणी हल्ल्यात २० वरुन २५ लाख रुपये मिळणार. ⁠पशुधन हानी नुकसान भरपाईत वाढ केली जाईल. अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले जाणार. ⁠महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेतला जाणार. सांगली येथे सौर उर्जा प्रकल्प राबवला जाणार. ⁠गोसेखुर्द प्रकल्पातून ६५ टीएमसी पाणी वळवले जाणार. ⁠जल युक्त शिवार अभियान २ राबवले जाईल”, असं अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.