⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

500 रुपयांच्या नोटबाबत मोठी अपडेट ; काय आहे जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. यानंतर 500 रुपयांच्या आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. तेव्हापासून हीच नोट चलनात आहे. या नोटा खऱ्या-खोट्या असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या असल्या तरी आता पुन्हा एकदा ५०० रुपयांच्या नोटा बनावट असल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या चित्रात 500-500 रुपयांच्या दोन नोटा दिसत आहेत. यातील 500 रुपयांच्या नोटेवर जिथे गांधीजींचा फोटो आहे, त्याशेजारी हिरवी पट्टी आहे. दुसरीकडे, दुसऱ्या फोटोतील हिरवी पट्टी गांधीजींच्या फोटोपासून थोड्या अंतरावर आहे आणि आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ आहे.

ही तुलना केली
आता या दोन नोटांची तुलना करताना असे सांगण्यात आले आहे की, ‘500 रुपयांच्या त्या नोटा घेऊ नका, ज्यामध्ये गांधीजींच्या जवळ हिरवी पट्टी बनवली आहे, कारण त्या बनावट आहेत. फक्त त्या 500 च्या नोटा घ्या, ज्यामध्ये RBI गव्हर्नरच्या स्वाक्षरीची हिरवी पट्टी आहे. कृपया हा संदेश तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना द्या. मात्र, हा मेसेज तपासला असता तो बनावट असल्याचे आढळून आले.

बनावट संदेश

पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच, पीआयबी फॅक्ट चेकमधून असे सांगण्यात आले आहे की आरबीआयच्या मते, दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत.