---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे भुसावळ

पोलीसांची मोठी कारवाई : 40 हजारांचा एमडी ड्रग जप्त !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मानवी जीवनावर परीणाम करणारा मेफेड्रोन हा गुंगीकारक पदार्थाचा सुमारे 40 हजारांचा साठा जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

md drug jpg webp webp

या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला न्यायालयात हजर केले असता 13 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

---Advertisement---

शहरातील श्रद्धा नगर भागातील 39 वर्षीय तरुणाकडे मानवी मेंदूला गुंगी आणणारा मेफेड्रोन (एम.डी.) पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे पथकाला आदेश दिले.

पोलिसांनी रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास छापेमारी करीत संशयित सतवंत जसवंत सिंह (39, रूम नं.6, उषा रेसीडेन्सी, जामनेर रोड, भुसावळ) यास ताब्यात घेत संशयिताच्या बेडरूममधून 13 ग्रॅम वजनाचा व 39 हजार 420 रुपये किंमतीचा साठा जप्त केला. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली असून मेफेड्रोन (एम.डी.) पदार्थ शहरात सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती आहे. या प्रकरणी नाईक निलेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---