---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा राजकारण

मोठी बातमी : संस्थेच्या जागेची परस्पर विक्री, माजी आमदारासह ७ जणांविरुद्ध गुन्हा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्हा ग्रामसुधार समितीच्या मालकीची पिंप्राळा शिवारात असलेली जमीन संस्थेच्या कागदपत्रात हेराफेर करून तसेच संस्थेची कागदपत्रे गैरमार्गाने मिळवीत विक्री केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली असून माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

फिर्यादी अशोक नामदेव राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी क्र.1) अजगर अजीज पटेल रा. भादली ता. जि. जळगाव गाव तथा बनावट सचिव जळगाव जिल्हा ग्राम सुधार समिती, कानळदा ता. जि. जळगाव यांनी दि. 13.03.2013 रोजी खोटी माहीती असलेला अर्ज 89992 क्र.05/2013 व त्यासोबत मा. धर्मदाय आयुक्त नाशिक यांचे कार्यालयात खोटे व बनावट दस्तऐवज दाखल करुन त्यांची दिशाभुल करुन दि. 13.06.2013 रोजी जमिन विक्री अनुषंगाने त्यांचे हिताचे आदेश पारीत करुन घेवुन संपुर्ण प्रक्रिया बनावट व खोटी असल्याचे माहीत असतांना सदर जमिन विक्री व्यवहारासाठी जळगाव पिपल्स को ऑफ बँक लि. गणेश कॉलनी शाखा, जळगाव येथे बनावट कागदपत्र दाखल करुन खाते क्रमांक 0060111000 0008 असे उघडून दि.19.07.2013 रोजी एकूण 48 पानांचा खरेदी खत क्रं.-4003/2013 अन्वये श्री. गुरुमुख मेहरुमुल जगवाणी यांना संस्थेची पिंप्राळा शिवारातील गट क्रं.- 338 / 1 क्षेत्र 66 आर, गट क्रं. – 339/ अ क्षेत्र 95 आर असे अंदाजे 5 ते 6 कोटी रकमेचे एकुण क्षेत्र 01 हेक्टर 69 आर हा भुखंड विक्री करुन संगनमताने व कट कारस्थान रचुन आरोपी क्र. 1 ते 7 यांनी संस्थेची फसवणुक केली आहे वगैरेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

---Advertisement---

अशोक राणे रा.भोईटे नगर यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अजगर अजीज पटेल, गुरुमुख मेहरूमल जगवानी, हरीष के मंधवानी, निलेश विष्णू भंगाळे, विठ्ठल गलाजी सोळंकी, मिना विठ्ठल सोळंकी, एच.ए.लोकचंदानी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---