जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या बंदोबस्तात पोलीस प्रशासन व्यस्त असल्याची संधी साधत चोरट्यांनी सराफा दुकानातून तब्बल एक कोटी 10 लाखांचे दागिणे लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. य़ामुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

धुळे शहरातील वर्दळीच्या समजला जणाऱ्या आग्रा रोडवर प्रमोद चौधरी यांचे स्वर्ण पॅलेस हे सराफा दुकान आहे. माहितगार चोरट्यांनी अवघ्या 15 मिनिटांत 1 कोटी 10 लाखांचे दागिने लंपास केले.ही घटना सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली. याच वेळी पोलिसांचे गस्ती पथक सायरन वाजवत आल्याने चोरट्यांनी पळ काढल्याने स्ट्राँगरूममधील 15 किलो सोने सुरक्षित राहिले.
आग्रा रोडवरील सुवर्ण पॅलेस दुकानाच्या मागील शटरची पट्टी कापून दोन चोरटे पहाटे 2.40 वाजता दुकानात शिरले. त्यानंतर सीसीटीव्ही, केबिनची काच फोडून काउंटरपमधील तसेच ड्रॉवरमधील सुमारे 720 ग्रॅमचे दागिने, 800 ग्रॅम शुद्ध सोने, 10 किलो चांदी, 10 हजार रोख असा सुमारे 1 कोटी 10 लाखांचा ऐवज लांबवला. चोरट्यांना ड्रॉवर व केबिनमधील स्ट्राँगरूम फोडता आले नसल्याने मोठे नुकसान टळले. पोलिसांचे गस्ती पथक सायरन वाजवत आल्याने 2.55 वाजता चोरटे पसार झाले.
एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, आझादनगर पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह ठसेतज्ज्ञांच्या पथकाने पाहणी केली. सोमवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या दौर्यात पोलीस व्यस्त असतील व त्यामुळे पळ काढता येईल, असा चोरट्यांचा कयास असल्याचा अंदाज आहे.(theft in dhule)