जळगाव जिल्हाजळगाव शहरमहाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी : दूध संघ निवणूक वेळेवरच, स्थगिती उठवली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध संघाची दोन दिवसापूर्वी स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया वेळेवरच होणार होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. राज्य सरकारने याबाबत नवीन अध्यादेश काढला असल्याचे वृत्त आहे.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत पर्यायी सहकारी संस्थांच्या निवडणुका एकत्रित झाल्या तर मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकांची प्रक्रिया शासनाने स्थगित केली होती. मात्र आता दूध संघाची निवडणूक वेळेवरच होणार आहे. हि निवडणूक १० तारखेला होणार आहे.

आमदार मंगेश चव्हाण हे निवडणूक वेळेवर व्हावी, यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवडणूक वेळेवर घेण्याची विनंती केली होती. आज याबाबतचे आदेश नुकतेच समोर आले आहेत. या आदेशात २९ नोव्हेंबर रोजी ज्या टप्प्यावर निवडणूक थांबवण्यात आली होती, तेथूनच पुढे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे

Related Articles

Back to top button