मोठी बातमी : जिल्हा परिदेच्या राणधुमाळीला सुरुवात गट, गण प्रभाग रचनांचे काम सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या  पत्रान्वये जाहीर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार जि.प.पं.स.सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गण यांची प्रभागरचना करण्याचे कामकाज ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथून करण्यात येत आहे. सदर प्रभाग रचना करण्याचे कामकाज सुरु आहे. काही स्थानिक दैनिकांमध्ये सदर प्रभाग रचनेबाबत आलेल्या चुकीच्या बातमीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आढळून आलेले आहे. तरी जि.प.पं.स.प्रभाग रचनेची अंतिम प्रसिद्धी जाहिर झालेली नसल्याचे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 येत्या पंधरा दिवसात निवडणुका जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये राजकीय गणिते आखण्याची सुरुवात झाली होती. यामुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी झाल्यास भाजपला धोबीपछाड देणे सहज शक्‍य असल्याचा सूर शिवसेना नेत्यांमध्ये आहे.जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवावी असा सूर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या बैठकीत पहायला मिळायला. जळगाव जिल्हा परिषदेचे मध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भाजपच वर्चस्व आहे. जिल्ह्यात विरोधक एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाला दणका बसू शकतो असा सूर शिवसेना नेत्यांमध्ये आहे. आम्हाला शिवसेनेने कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही असे मत राष्ट्वादीचे होत. तर भाजपचं जिल्हा परिषद जिंकणार असे जळगाव लाईव्हशी बोलताना गिरीश महाजन म्हटले होते. यामुळे आता काय होते ते पाहावे लागणार आहे.

जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या  पत्रान्वये जाहीर करण्यात आलेला आता जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. तर दुसरीकडे आता या निर्णयामुळे प्रशासन तयारीला लागलं आहे.