⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | महाराष्ट्र | Eknath Shinde Updates : दीपक केसरकरांसह आणखी ४ आमदार शिंदे गटात सामील

Eknath Shinde Updates : दीपक केसरकरांसह आणखी ४ आमदार शिंदे गटात सामील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । राज्यात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या घडामोडी घडत असून शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ShivSena) यांनी मोठा गट फोडला असून जवळपास ४० आमदारांना घेऊन ते गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत महाविकास आघाडीतून (MahaVikas Aaghadi) बाहेर पडा असे शिंदे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारीच वर्षा बंगला सोडला असून ते मातोश्रीवर परतले आहे. शिवसैनिक आणि नाराजांनी समोर येऊन सांगितले तर मी राजीनामा देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे गटातील एक-एक आमदार फुटत असून आज माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह आणखी ४ आमदार गुवाहाटीला पोहचले आहेत.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते. नगरविकास खात्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या कामात होत असलेल्या ढवळाढवळला ते कंटाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी याबाबत बोलून दाखविले होते. पक्षप्रमुख मनावर घेत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४० आमदार आणि मंत्र्यांचा मोठा गट फोडत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात सध्या त्यांच्याकडे ४६ आमदार असल्याचे सांगितले होते. शिंदे यांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी ३६ आमदारांची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा : Eknath Shinde Updates : जळगावातील शिवसेनेचा शेवटचा आमदार देखील फुटला!

एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत आघाडीतून बाहेर पडा असे ट्विट केले होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला. मला माझ्या लोकांनी सांगितले असते की, तुम्ही मला मुख्यमंत्री म्हणून नको, तुम्ही नालायक आहेत तर मी या क्षणाला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. अशी भावनिक साध उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली. याच बरोबर ते शिवसैनिकांना देखील भावनिक साद घालत म्हणाले कि, जर तुम्हाला पक्षप्रमुख नको असे वाटत असेल तर स्पष्टपणे सांगा मी त्याचाही राजीनामा देतो, मुख्यमंत्री यांनी सांगितले होते.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरे स्पष्ट म्हणाले.. समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुखपदाचा राजीनामा देतो!

गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीत शिवसेनेतील आणि अपक्ष आमदार एक-एक करून बाहेर पडत असून एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन सामील होत आहे. राज्याचे मुलुख मैदान तोफ आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह बुधवारी गुवाहाटीला जाऊन पोहचले होते. ढाण्या वाघ गेल्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडले होते. शिवसेना गुलाबराव पाटलांचा धक्का पचवू शकले नाही तोच शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह आशिष जैस्वाल, सदा सरवणकर, मंगेश कुडाळ हे देखील गुवाहाटीला पोहचल्याही माहिती समोर येत आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.