---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंचे ६ आमदार शिवसेनेत जाणार !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । लवकरच उद्धव ठाकरे गटातील सहा आमदार आमच्यासोबत येतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला केला आहे.यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे महायुती मजबुत झाली आहे.आमच्यात कोणतीही नाराजी नाही. त्या केवळ आफवा आहेत.

यावेळी ते असेही म्हणाले की,अजित पवारांमुळे आमच्यात नाराजी आहे, ही केवळ आफवा आहे. उद्धव ठाकरे गटाकडून पसरविली जात आहे. मात्र त्यामध्ये काहीच तथ्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असून पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकासुद्धा त्यांच्याच नेतृत्वात लढविण्यावर भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे.

‘‘आमदारांना पात्र करायचे की अपात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असतो. आमचे आमदार नियमानुसार आमची बाजू मांडतील. विधानसभा अध्यक्षच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील.

udhav thakre jpg webp

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---